Indigo Holi Sale: देशांतर्गत विमानप्रवास 899 रुपयांत तर आंतरराष्ट्रीय तिकीट 3,399 रुपयांपासून उपलब्ध
IndiGo (Photo Credits: Wikimedia Commons)

इंडिगो एअरलाईन्सने (IndiGo Airlines) देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही स्तरावर होळीच्या निमित्ताने तीन दिवसांच्या विशेष सेलची घोषणा केली आहे. इंडिगो होळी सेलअंतर्गत प्रवाशांना विशेष सूट देण्यात येणार आहे. हा सेल 5 ते 7 मार्च दरम्यान सुरु राहील. या काळात तिकीट बुक केल्यास देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांची तिकीटं स्वस्तात मिळतील. या सेल अंतर्गत देशांतर्गत विमानांचे तिकीट दर 899 रुपयांपासून सुरु होत आहेत. तर आंतरराष्ट्रीय विमानांचे दर 3,399 रुपयांपासून सुरु होतील. हा सेल 19 मार्च ते 28 सप्टेंबर 2019 या काळातील प्रवास तिकीटांवर लागू होईल.

देशातील सर्वात मोठी एअरलाईन्स असलेल्या इंडिगोचे देशात 40% प्रवासी आहेत. या सेलअंतर्गत दिल्ली ते अहमदाबाद पर्यंतचे तिकीट 2199 रुपयांत मिळेल. तर दिल्ली ते अमृतसर हा प्रवास तुम्ही केवळ 1899 रुपयांत करु शकाल. दिल्ली ते चेन्नई या प्रवासासाठी तुम्हाला 2799 रुपये मोजावे लागतील.

इतर तिकीट दर:

- दिल्ली ते मुंबई- 2,399 रुपये

- दिल्ली ते दोहा- 9099 रुपये

- दिल्ली ते दुबई- 6499 रुपये

- दिल्ली ते कोलकाता- 2899 रुपये

- दिल्ली ते लखनऊ- 1599 रुपये

- बंगळुरु ते अहमदाबाद- 1,799 रुपये

- बंगळुरु ते दिल्ली- 2,899 रुपये

- बंगळुरु ते कोलकत्ता- 3,199 रुपये

यात सेलमध्ये तुम्हाला अधिक सूट मिळू शकते. मात्र त्यासाठी तुम्हाला इंडसइंड बँकेचे कार्ड वापरावे लागले. हे कार्ड वापरल्यास तुम्हाला 20% अधिक डिस्काऊंट मिळेल. म्हणजेच तुमचे तब्बल 2 हजार रुपये वाचतील. तर मोबिक्विकवर 15% किंवा 800 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळेल.

मात्र या सेलअंतर्गत एअरपोर्ट चार्ज किंवा सरकारी टॅक्सवर कोणतेही डिस्काऊंट मिळणार नाही. या ऑफरचा लाभ तुम्ही इतर ऑफरसह घेऊ शकत नाही. त्याचबरोबर या सेलमधील सूट ग्रुप बुकिंगसाठी लागू होणार नाही.