
हॉटेल्स ही फक्त विश्रांतीची ठिकाणे नाहीत, तर ती आराम आणि अविस्मरणीय अनुभवांची आश्रयस्थाने आहेत. भव्य सुइट्सपासून ते आरामदायी कॉटेजपर्यंत, योग्य निवास व्यवस्था कोणत्याही सहलीला खास बनवू शकते. चांगली हॉटेल्स तुमच्या प्रवासाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. आता लोकप्रिय आंतरराष्ट्रीय प्रवास मार्गदर्शक ट्रिपअॅडव्हायझरने जगातील सर्वोत्तम हॉटेल्सची 2025 (10 Best Hotels in The World) ची यादी प्रसिद्ध केली आहे. ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मने जागतिक स्तरावर सर्वोच्च दर्जा असलेल्या निवासस्थानांचे निर्धारण करण्यासाठी साइटवर सूचीबद्ध केलेल्या, 1.6 दशलक्षाहून अधिक हॉटेल्समधील 12 महिन्यांच्या पुनरावलोकन डेटाचे विश्लेषण केले आहे.
यामध्ये मेक्सिको च्या Secrets Akumal Riviera Maya ने प्रथम क्रमांक पटकावला आहे. महत्वाचे म्हणजे केरळमधील दोन आलिशान हॉटेल्स- गोकुलम ग्रँड टर्टल ऑन द बीच आणि चांद्याज विंडी वुड्स, यांनी 2025 साठी जागतिक स्तरावरील 10 सर्वोत्कृष्ट हॉटेल्सच्या यादीत अनुक्रमे 3 रे व 9 वे स्थान मिळवले आहे. या यशामुळे केरळच्या पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्रातील जागतिक दर्जा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
गोकुलम ग्रँड टर्टल ऑन द बीच: कोवलममधील आलिशान अनुभव-
कोवलम येथील हवा बीचच्या किनारी वसलेले गोकुलम ग्रँड टर्टल ऑन द बीच हे पंचतारांकित बुटीक हॉटेल आहे, जे आधुनिक सुखसोयी आणि पारंपरिक भारतीय डिझाइनचा सुंदर संगम सादर करते. या हॉटेलमध्ये अरबी समुद्राच्या दृश्यासह चार प्रकारच्या खोल्या उपलब्ध आहेत- अरेबियन सी व्ह्यू रूम, डुप्लेक्स रूम, डुप्लेक्स सुइट आणि सिग्नेचर सुइट. प्रवाशांना येथे योग सत्र, आयुर्वेदिक स्पा उपचार आणि समुद्रकिनाऱ्यावरील शांत वातावरणाचा आनंद घेता येतो. हॉटेलच्या भोजन सुविधाही तितक्याच वैविध्यपूर्ण आहेत. ‘कॅटमरन’ रेस्टॉरंटमध्ये जागतिक स्तरावरील पदार्थ मिळतात.
येथील प्रत्येक खोलीत लाकडी सजावट आणि भारतीय कला यांचा वापर केला गेला आहे, ज्यामुळे पाहुण्यांना स्थानिक संस्कृतीची जवळून अनुभूती मिळते. कोवलम हे केरळमधील एक प्रमुख पर्यटन स्थळ असून, येथील शांत समुद्रकिनारा आणि आयुर्वेदिक उपचार केंद्रे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतात.
चांद्याज विंडी वुड्स: मुन्नारमधील निसर्गरम्य निवास-
मुन्नारच्या हिरव्यागार डोंगररांगांमध्ये वसलेले चांद्याज विंडी वुड्स हे एक शांत रिसॉर्ट आहे, जे निसर्गप्रेमींसाठी स्वर्गापेक्षा कमी नाही. या हॉटेलच्या खोल्या धुक्याने झाकलेल्या डोंगरांच्या विस्तीर्ण दृश्यांसह डिझाइन केल्या आहेत, ज्यामुळे पाहुण्यांना निसर्गाशी एकरूप होता येते. यातील सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे ‘एन्चँटिंग फॉरेस्ट वॉक’, जे पाहुण्यांना धबधबे, दगडी पूल आणि निसर्गाने प्रेरित रचनांमधून मार्गक्रमण करायला घेऊन जाते. या मार्गावर एक छोटेसे कॉफी शॉपही आहे, जे स्थानिक केरळी खाद्यपदार्थांचा अनुभव देते.
चांद्याज विंडी वुड्स हे मुन्नार बस स्थानकापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर आहे, ज्यामुळे ते शहराच्या गजबजाटापासून दूर शांततेचा अनुभव देते. या रिसॉर्टची सरासरी किंमत दोन व्यक्तींसाठी एका रात्रीसाठी सुमारे 12,500 रुपये आहे, जे ट्रिपअॅडव्हायझरच्या ताज्या दरांनुसार आहे. (हेही वाचा: Indian Railways Heritage Train Tour: भारतीय रेल्वे 9 जूनपासून सुरु करणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाला समर्पित सर्किट हेरिटेज ट्रेन टूर; जाणून घ्या दर व ठिकाणे)
ट्रिपअॅडव्हायझर जगातील 10 सर्वोत्तम हॉटेल्स-
सिक्रेट्स अकुमल रिव्हिएरा माया, मेक्सिको
ग्रँडव्ह्रीओ ओशन रिसॉर्ट दानांग, व्हिएतनाम
, भारत
रोमान्स इस्तंबूल हॉटेल, तुर्की
बुकुटी आणि तारा बीच रिसॉर्ट अरुबा, कॅरिबियन
सेंट एर्मिन्स हॉटेल, ऑटोग्राफ कलेक्शन, यूके
हयात झिलारा कॅप काना, कॅरिबियन
फ्रेंच क्वार्टर इन, यूएसए
चँडिस विंडी वुड्स, भारत
सियाम वर्ल्ड मालदीव, मालदीव
दरम्यान, ट्रिपअॅडव्हायझरने 2025 साठी जागतिक स्तरावरील सर्वोत्कृष्ट हॉटेल्सची यादी तयार करण्यासाठी 12 महिन्यांच्या पुनरावलोकन डेटाचे विश्लेषण केले. यामध्ये प्रवाशांच्या अनुभवांवर आधारित सेवा, सुविधा, स्थान आणि एकूण समाधान यांचा विचार केला गेला.