Mahashivratri 2022: फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री व्रत केले जाते. यंदा महाशिवरात्री मंगळवारी 1 मार्च म्हणजेचं आज आहे. या दिवशी भगवान भोलेनाथाची पूजेला विशेष महत्त्व आहे. महाशिवरात्री निमित्त पूजेचा शुभ मुहूर्त, पूजेची पद्धत आणि त्याचे महत्त्व जाणून घेऊयात. (वाचा- Mahashivratri 2022 Messages: महाशिवरात्री निमित्त Images, Wishes, Greetings, Whatsapp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरा करा शिव शंकराचा दिवस!)
- महाशिवरात्री निमित्त 'या' पद्धतीने करा भगवान शंकराची पूजा -
उपवास करणाऱ्यांनी दिवसभर शिव मंत्राचा (ओम नमः शिवाय) जप करावा आणि दिवसभर उपवास करावा. (अशक्त आणि वृद्ध व्यक्ती दिवसा फळे घेऊन रात्री पूजा करू शकतात.)
- शिवपुराणात रात्रीच्या चारही चरणांमध्ये शिवाची पूजा करण्याचा नियम आहे. संध्याकाळी स्नान करून शिवमंदिरात जाऊन किंवा घरी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून त्रिपुंड व रुद्राक्ष धारण करून पुढीलप्रमाणे पूजेचा संकल्प करावा.
- ममखिलपापाक्षे सलभिष्टसिद्धये शिवप्रीतीर्थं च शिवपूजनहम् करिष्ये
- भक्ताने रात्रीचे चारही तास फळे, फुले, चंदन, बिल्वाची पाने, धतुरा, धूप आणि दिवा लावून पूजा करावी आणि भोगही अर्पण करावेत.
- शिवलिंगाला पंचामृताने स्नान केल्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर वेगवेगळे एकत्र करून पाण्याने अभिषेक करावा.
- चारही प्रहारांच्या पूजेमध्ये शिवपंचाक्षर (नमः शिवाय) मंत्राचा जप करावा. भव, शर्व, रुद्र, पशुपति, उग्र, महान, भीम आणि ईशान या आठ नावांना पुष्प अर्पण करून भगवान शंकराची आरती आणि प्रदक्षिणा करा.
पूजेचा मुहूर्त -
महाशिवरात्री 1 मार्च मंगळवारी पहाटे 03.16 पासून सुरू होईल, त्याची समाप्ती 2 मार्च बुधवारी चतुर्दशीला सकाळी 10 वाजता होईल. मंगळावरी 4 वाजता भगवान शंकराची पूजा केली जाईल.
शिवशक्ती मिलन दिवस
महाशिवरात्रीच्या अनेक कथा आहेत. एका पौराणिक कथेनुसार, माता पार्वतीने शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. त्यामुळे माता पार्वतीचा विवाह भगवान शिवाशी फाल्गुन कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला झाला. त्यामुळे हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो.
भगवान शंकराला अशा प्रकारे बेलाची पाने करा अर्पण -
शिवलिंगावर नेहमी बेलपत्र अर्पण करावे, असे सांगितले जाते. बेलपत्राचा गुळगुळीत भाग आतील बाजूस म्हणजेच शिवलिंगाच्या दिशेने असावा.