Photo Credit- X

Maha kumbh 2025: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळ्याचा महाशिवरात्रीनिमित्त आणि २६ फेब्रुवारी रोजी कार्यक्रमाचा शेवटचा दिवस असल्याने महाकुंभात सहभागी होण्यासाठी आणि पवित्र स्नान करण्यासाठी भाविक आज प्रयागराजमध्ये दाखल होऊ लागले आहेत. महाकुंभमेळ्याचाच्या शेवटच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. भाविकांना विनाअडथळा गंगेत स्नान करता यावे, यासाठी महाशिवरात्री उत्सवाची तयारी मेळा प्रशासनाने पूर्ण केली आहे. महाशिवरात्रीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रयागराजचे डीएम रवींद्र कुमार मंडल यांनी सांगितले की, महाशिवरात्रीला महाकुंभमेळ्यातील अंतिम स्नान होईल. येथे येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षित स्नानासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.

येथे पाहा व्हिडीओ: 

हवाई, रेल्वे आणि खासगी वाहनांनी भाविक येथे पोहोचत असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तयारी पूर्ण झाली आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे २६ फेब्रुवारीला हा आकडा ७० कोटींवर जाण्याची शक्यता आहे.

महाशिवरात्रीसाठी येथे येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षित स्नानासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. हवाई, रेल्वे आणि खासगी वाहनांनी भाविक येथे पोहोचत असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तयारी पूर्ण झाली आहे.