Shardiya Navratri 2023 (PC - File Image)

Ghatasthapana 2023 Puja Vidhi:  यंदा 15 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीची सुरुवात होती. त्याचप्रमाणे पहिल्या प्रतिपदा तिथीला घटस्थापना होते आणि त्यानंतर ही दुर्गा पूजा सुरू होती. घटस्थापना शुभ मुहूर्त 15 ऑक्टोबर, रविवार सकाळी 11:44 पासून सुरू होईल जो की दुपारी 12:30 पर्यंत, त्याच घरात घटस्थापना करण्यासाठी संपूर्ण 46 मिनिटे शुभ मुहूर्त आहे. भारतात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भारतात काही ठिकाणी देवीच्या मुर्तीची पूजा केली जाते तर काही ठिकाणी देवीच्या प्रतिमेचा फोटो ठेवून पूजा अर्चना केली जाते. शारदीय नवरात्री १५ ऑक्टोबरपासून सुरू होत असून २४ ऑक्टोबरला संपणार आहे. घटस्थापनेसाठी शुभ मुहूर्त काय असेल ते जाणून घेऊया.

अशी  करा घटस्थापना 

हिंदू शास्त्रानुसार सकाळी उठल्यावर घटस्थापना आणि देवीपूजन करत असतो. मात्र यात चित्रा नक्षत्र आणि वैधृती योग निषिद्ध मानले जातात. यंदा पंचांगानुसार, रविवार, १५ ऑक्टोबर २०२३ रोजी चित्रा नक्षत्र संध्याकाळी ६ वाजून १२ मिनिटांनी सुरू होईल आणि वैधृती योग सकाळी १० वाजून २४ मिनिटांनी असेल. त्यामुळे विशेष परिस्थितीत चित्रा नक्षत्र आणि वैधृती योग यांचे दोन चरण निघून गेल्यावर घटस्थापना करता येईल.

शुभ मुहूर्त- सकाळी ११ वाजून ४४ मिनिटे ते १२ वाजून ३० मिनिटापर्यंत असणार.

घटस्थापना विधी

  1.   घटस्थापनेसाठी ईशान्य किंवा उत्तर दिशा सर्वोत्तम स्थान मानले जाते.
  2. घट हा पाटा किंवा चौरंगावर मांडला जातो. पाटाखाली चारही बाजूनें सुंदर रांगोळी काढावी, त्यावर हळद व कुंकू लावा
  3. चौरंगावर किंवा पाटावर लाल वस्त्र अंधरा. लाल हिंदू धर्मात लाल वस्त्र हे शुभ मानले जाते.
  4.  एका टोपलीत किंवा परातीत काळी माती घालून त्यावर धान्य पेरा, त्याच्या मधोमध मातीचा किंवा तांब्याचा घट घेवून पाच पदरी दोरा बांधावा. घटावर स्वतिक कुंकूने काढावेत. घटात (कलश) पाच विड्याची पाने ठेवावी. (
  5.  हळद कुंकू, १ रुपयाचे नाण, सुपारी, फुल अस सर्व साहित्य कशल मध्ये टाकावे. त्यावर नारळ ठेवावे, नारळाचे मुख खालच्या दिशेला असता कामा नये हे ध्यानात ठेवावे.
  6. घटस्थापनेच्या आधी गणपतीची पूजा करावी.
  7.  चौरंगावर घट ठेवण्यापूर्वी तांदूळ ठेवावे त्यावर टोपली ठेवा.
  8.  घटावर तुम्ही चुनरी देखील चढवू शकता. वेणी, गजरा घाला. दिवा-अगरबत्ती ओवाळा. दोन्ही बाजूला तुम्ही समया देखील लावू शकता किंवा अंखड दिवा लावा.मिठाई गोड नैवेद्य ठेवा.
  9. आवडीनुसार घटावर फुलांची माळ चढवा,
  10. दररोज सकाळ- संध्याकाळ देवीच्या घटाची पूजा आरती करावी.नैवेद्य दाखवावे. दिवसांतून दोनवेळा धान्यावर पाणी घाला.