
Navratri 2023 Invitation Card Format in Marathi: सर्वपित्री अमावस्या म्हणजेच अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला पितरांना निरोप देण्याच्या दुसऱ्या दिवशी शारदीय नवरात्रीला (Shardiya Navratri) सुरुवात होईल. या वर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात 15 ऑक्टोबर 2023 पासून होत आहे. हा उत्सव नऊ दिवसांनंतर 23 ऑक्टोबर 2023 रोजी विजयादशमीला संपेल. नऊ दिवस चालणाऱ्या नवरात्रोत्सवात माँ दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. प्रत्येक दिवस माँ दुर्गेच्या एका रूपाला समर्पित आहे.
शारदीय नवरात्रीला, माता दुर्गा आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कैलास पर्वतावरून पृथ्वीवर येते, म्हणून सार्वजनिक पंडाल आणि घरांमध्ये मोठ्या थाटामाटात तिचे स्वागत केले जाते. प्रतिपदा तिथीला घटस्थापना आणि माँ दुर्गेच्या मूर्तींचे स्वागत केले जाते. तुम्ही तुमच्या प्रियजनांना नवरात्रि निमित्त माता की चौकी, कन्या पूजन किंवा जागरणाच्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका पाठवून शकता. यासाठी तुम्हाला खालील मेसेज, ईमेज नक्की उपयोगात येतील. तुम्ही या ईमेज मोफत डाऊनलोड करून आपल्या मित्र-परिवारास पाठवू शकता. (हेही वाचा- Saptashrungi Navratri Utsav 2023: नवरात्री मध्ये सप्तशृंगीदेवी चं दर्शन यंदा भाविकांसाठी 24 तास खुले)
नमुना क्रमांक १ -
नवरात्री मध्ये महाअष्टमी च्या दिवशी आमच्या घरी 'माता की चौकी' चं आयोजन करण्यात आलं आहे. तरी आपण यामध्ये सहभागी व्हावं ही अपेक्षा
स्थळ-
तारीख-
वेळ-

नमुना क्रमांक २ -
नवरात्री मध्ये यंदा ..... संकुलामध्ये भोंडला चं आयोजन करण्यात आलं आहे. तरी पारंपारिक मराठी वेशभूषेमध्ये तुम्ही तुमच्या सख्या-सवंगड्यांसोबत या खेळामध्ये सहभागी व्हावं हे आग्रहाचं निमंत्रण
स्थळ-
तारीख-
वेळ-

नमुना क्रमांक ३ -
जय माता दी
नवरात्री दरम्यान 'माता रानी च्या जागरणा'चं सस्नेह आमंत्रण
स्थळ-
तारीख-
वेळ-

नमुना क्रमांक ४ -
आमच्या येथे महाष्टमी दिवशी कन्यापूजन आणि माता की चौकी चं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामध्ये आपल्या लेकींसह उपस्थिती अपेक्षित आहे.
स्थळ-
तारीख-
वेळ-

नमुना क्रमांक ५ -
माता की चौकी
यंदा नवरात्री दरम्यान आमच्या घरी महाष्टमी दिवशी 'माता की चौकी' चं आयोजन करण्यात आलं आहे. तरी आपण हजेरी लावावी.
स्थळ-
तारीख-
वेळ -

ज्योतिषशास्त्रानुसार अभिजीत मुहूर्त आणि प्रतिपदा तिथीमध्ये कलशाची स्थापना करणे नेहमीच शुभ मानले जाते. यावेळी 15 ऑक्टोबर रोजी अभिजीत मुहूर्त सकाळी 11:38 पासून सुरू होत असून तो दुपारी 12:23 पर्यंत चालेल. यानंतर 12:24 मिनिटांनी वैधृती योग सुरू होईल. अशा स्थितीत यावेळी शारदीय नवरात्रीमध्ये कलश स्थापनेसाठी केवळ 45 मिनिटांचाच शुभ मुहूर्त आहे.