
Maharashtra Bendur Messages in Marathi: ग्रामिण भारतातील अनेक प्रमुख सणांपैकी एक सण अशी बेंदूर सणाची ओळख आहे. हा सण शेतकीर आणि शेतीशी निगडीत असला तरी, प्रामुख्याने तो शेतकऱ्याचे सोबती असलेल्या बैल आणि इतर पशूंचा अधिक आहे. वर्षभर शेतात राब राब राबून बळीराजाची सेवा करणार्या व भारतीय कृषी संस्कृतीमध्ये महत्त्वाचा घटक मानल्या जाणार्या बैलांप्रती कृतज्ञता म्हणून साजरा करण्यात येणारा 'महाराष्ट्रीय बेंदूर सण' (Maharashtra Bendur 2020) 4 जुलै रोजी म्हणजेच शनिवारी साजरा होणार आहे. बेंदूर हा सण मध्य आणि दक्षिण भारतातील कर्नाटक (Karnatak), छत्तीसगड (Chhatisgarh), महाराष्ट्र (Maharashtra) आणि मध्य प्रदेश (Madhya Pradesh) या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. बेंदूर सणाला अनेक ठिकाणी बैलपोळा (Bailpola) असंही म्हटलं जात. बेंदूर सणाच्या दिवशी शेतकरी बैलांची विधीवत पूजा करुन त्यांची मिरवणूक काढतात.
मात्र, ज्यांच्याकडे शेतीही नाही आणि बैलही नाहीत, असे लोक बैलांप्रती कृतज्ञता म्हणून बेंदूर सणादिवशी मातीचे बैल पूजतात. महाराष्ट्र-कर्नाटक सीमारेषेवरील कोल्हापुर सहित काही गावांमध्ये बेंदूर सण साजरा केला जातो. (हेही वाचा - Ashadhi Ekadashi 2020: आषाढी एकादशी 2020 मध्ये कधी आहे? जाणून घ्या व्रत, शुभ मुहूर्त वेळ आणि चातुर्मासाचा काळ)
शिंगे घासली, बाशिंगे लावली,
म्होरकी आवळली, तोडे चढविले,
कासरा ओढला, घुंगर माळा वाजे खळखळा,
आज सण आहे बैळपोळा
शेतकरी बांधवास बेंदूर सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

वाडा शिवार सारं, वाडवडिलांची पुण्याई
किती वर्णू तुझे गुण, मन मोहरून जाई,
तुझ्या अपार कष्टाने बहते सारे रान
एका दिवसाच्या पुजेने होऊ कसा उतराई
शेतकरी बांधवास बेंदूर सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

जमतील ढग, बरसेल मेघराजा
होईल पाणी पाणी, हटेल दुष्काळ
झटकेल धूळ होईल नवी पहाट
सर्जा-राजासंग बळीराजा करेन नवी सुरुवात
शेतकरी बांधवास बेंदूर सणाच्या हार्दिक शुभेच्छा !

झुल, शेंब्या, चाळ, घुंगरं..
तिफन, कुळव, शिवाळ
शेती अवजारांचा आज थाट
औताला सुट्टी, सर्जा-राजा आनंदात
शेतकरी बांधवास बेंदूर सणाच्या हार्दिक शुभेच्छा !

आला बेंदूर बेंदूर..
सण वर्षाचा घेऊन
खांदेमळणी झाल्यावर लागली चाहूल
सर्जा-राजा गेले आनंदून
शेतकरी बांधवास बेंदूर सणाच्या हार्दिक शुभेच्छा !

पुरातन काळापासून शेती, शेतकरी व बैल असे समिकरण रुजलेले आहे. शेती करण्यासाठी बैल हा महत्त्वाचा घटक समजला जातो. नांगरणी, पेरणी ते मळणीपर्यंत बैलांचा शेतीत खूप मोठा सहभाग असतो. बेंदूर सणाच्या दिवशी बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून गोडधोड खायला देतात. या दिवशी त्यांची वाद्यांच्या गजरात मोठ्या उत्साहात मिरवणूक काढली जाते. पश्चिम महाराष्ट्रात बेंदूर, तर उर्वरित महाराष्ट्रात बैल पोळा म्हणून हा सण उत्साहात साजरा केला जातो.