Janmashtami 2020 Vrat: गोकुळाष्टमी दिवशी कृष्ण जन्मोत्सव साजरा करण्याचा शुभ मुहूर्त, पूजा विधी!
Krishna Janmashtami (File Image)

Gokulashtami 2020  Shubha Muhurat:  आज श्रावण कृष्ण अष्टमी म्हणजेच गोकुळाष्टमी (Gokulashtami). भगवान श्रीकृष्णाचा जन्म श्रावण महिन्यातील अष्टमीला झाल्याने कृष्णअष्टमीच्या (Krishna Janmashtami) रात्री कृष्ण जन्म साजरा करण्याची पद्धत आहे. महाराष्ट्रासह देशभर आज (11 ऑगस्ट) रात्री कृष्ण जन्म साजरा केला जाणार आहे. यंदा कोरोना संकटामुळे महाराष्ट्रात अद्याप मंदिरं उघडली नाहीत. त्यामुळे कृष्णाचे भक्त आज रात्री घरोघरी पाळणा सजवून त्यामध्ये बाळकृष्णाच्या मूर्तीची पुजा करून कृष्ण जन्म (Krishna Janma) साजरा करणार आहेत. मग यंदा तुमच्या घरी देखील कृष्ण जन्म साजरा करण्याची लगबग असेल तर जाणून घ्या आज मध्यरात्री कृष्ण जन्म साजरा करण्याचा शुभ मुहूर्त, पूजा विधी काय असतात.

दरम्यान अनेक घरांमध्ये कृष्ण जन्मोत्सवाच्या दिवशी एक दिवसाचा उपवास ठेवला जातो. दिवसभर उपवास करून कृष्णाची आराधना केली जाते. रात्री कृष्ण जन्म साजरा केला जातो. त्यासाठी घरामध्येच पाळणा साजरा केला जातो. Janmashtami 2020 Wishes: श्री कृष्ण जन्माष्टमीच्या मराठी शुभेच्छा Messages, HD Images द्वारा WhatsApp, Facebook वर देऊन साजरी करा गोकुळाष्टमी.

गोकुळाष्टमी 2020 पूजा विधी

यंदा 11 ऑगस्टच्या दिवशी श्रावण कृष्ण अष्टमीची सुरूवात सकाळी 9 वाजून 6 मिनिटांनी होणार आहे. तर 12 ऑगस्टला सकाळी 11 वाजून 16 मिनिटांनी सांगता होणार आहे. दरम्यान कृष्ण जन्म मध्यरात्री 12 च्या सुमारास झाला अशी आख्यायिका असल्याने रात्री कृष्णाजन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत आहे.

कृष्ण जन्मोत्सव 2020 ची वेळ :

12 ऑगस्ट मध्यरात्री - 12 वाजून 5 मिनिटं ते रात्री 12 वाजून 48 मिनिटं

यंदा 12 ऑगस्टच्या मध्यरात्री 43 मिनिटांचा कालावधी हा श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्याचा शुभ मुहूर्त आहे. तर कृष्ण जन्म साजरा झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी दही हंडी म्हणजेच गोपाळकाला साजरा केला जाणार आहे. Janmashtami 2020 Dress Ideas: श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त लहान मुलांना कृष्ण आणि राधेच्या रुपात कसे तयार कराल? जाणून घ्या काही सोप्या टिप्स.

जन्माष्टमी पूजा विधी

यशोदामाता आणि बाळकृष्ण मूर्ती यांचे पूजन कृष्ण जन्माष्टमीच्या रात्री केले जाते. चौरंगावर पाच तऱ्हेच्या पानांनी सजविलेल्या कलशाची स्थापना केली जाते. त्यावर ताम्हण ठेवतात. या ताम्हणात कृष्णाला दूध पाजणाऱ्या यशोदामातेची मूर्ती ठेवली जाते. रात्री बारापासून श्रीकृष्णाची पूजा सुरू होतेे. भगवान कृष्णाच्या मूर्तीला दूध, दही, मध आणि तूपाने स्नान घातले जाते.  गंगेच्या पाण्याने  घालून मूर्ती स्वच्छ  केली जाते. त्यानंतर नववस्त्रांनी बाळकृष्णाची मूर्ती सजवली जाते. त्यांची षोडोपचार पूजा केली जाते. बाळकृष्णासाठी खास पाळणा सजवला जातो. त्यांना सजवलेल्या पाळण्यामध्ये ठेवून कृष्णाजन्माच्या वेळेस आरती गाऊन कृष्ण जन्म साजरा केला जातो.

भगवान विष्णूचा आठवा अवतार म्हणून श्रीकृष्ण ओळखले जातात. कौरव -पांडवांच्या युद्धामध्ये कृष्णाने अर्जुनाला कर्तव्य आणि कर्म संबंधाने अमुल्य उपदेश केला होता. तो उपदेश भगवतगीता म्हणून ओळखला जातो. संपूर्ण जगभरात भगवतगीता हा पवित्र ग्रंथांपैकी एक मानला जातो. त्याचं पूजन केले जातं. भगवतगीतेची शिकवण श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या निमित्ताने जनमाणसांमध्ये रूजवण्याचा प्रयत्न केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने त्याचे पठण केले जाते.