Janmashtami 2020 Wishes: श्री कृष्ण जन्माष्टमीच्या मराठी शुभेच्छा Messages, HD Images द्वारा WhatsApp, Facebook वर देऊन साजरी करा गोकुळाष्टमी
Gokulashtami 2020 | File Photo

Happy Gokulashtami Marathi Wishes:  भगवान विष्णूचा अवतार असणार्‍या श्रीकृष्णाचा जन्मोत्सव (Krishna Janmotsav) म्हणजे गोकुळाष्टमी! भारतामध्ये श्रावण कृष्ण अष्टमी दिवशी साजरा केला जातो. यंदा ग्रेगेरियन कॅलेंडनुसार 11 ऑगस्टच्या मध्यरात्री हा श्री कृष्ण जन्माष्टमी (Krishna Janmashtami)  म्हणजेच कृष्ण जयंतीचा (Krishna Jayanti) सोहळा साजरा केला जाणार आहे. दरम्यान महाराष्ट्रामध्ये कृष्ण जन्माष्टमी (Krishna Janmashtami) हा सण गोकुळाष्टमी (Gokulashtami) म्हणून देखील ओळखला जातो. मग यंदा भगवान श्रीकृष्णाची कृपा तुमच्यासह, तुमच्या कुटुंबावर, मित्र-मैत्रिणींसोबतच प्रियजनांवर कायम राहावी याकरिता गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा मराठी संदेश, विशेस, मेसेजेस, Hd Images, GIFs च्या माध्यमातून देऊन आनंदात साजरा कृष्ण जन्मोत्सवाचा सोहळा. भगवान कृष्णाचे अनेक भाविक कृष्ण जयंती दिवशी एक दिवसाचा उपवास ठेवतात. कृष्ण जन्मानंतर दुसर्‍या दिवशी तो सोडला जातो.

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृष्ण मंदिरामध्ये साजरा होणारा कृष्ण जन्माचा सोहळा रद्द झाला असला तरीही घरोघरी भाविक पाळणा सजवून भगवान कृष्णाचा जन्मदिवस साजरा करणार आहेत. मग त्यांचा आनंद आणि उत्साह द्विगुणित करण्यासाठी कृष्णाच्या जन्मदिवसानिमित्त खास शुभेच्छापत्र WhatsApp, Facebook, Instagram सह सोशल मीडीयात शेअर करून कृष्ण जन्मोत्सवाच्या पावन पर्वाच्या शुभेच्छा द्या.

गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

Gokulashtami 2020 | File Photo

अच्युत्म केशवं कृष्ण दामोदरं ।

राम नारायणं जानकी वल्लभं ॥

कृष्ण जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

via GIPHY

Gokulashtami 2020 | File Photo

राधेची भक्ती, बासरीची गोडी

लोण्याचा स्वाद सोबतीला गोपिकांचा रास

मिळून साजरा करू

श्री कृष्ण जन्मोत्सवाचा दिवस आज खास

गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

Gokulashtami 2020 | File Photo

गोकुळाष्टमीच्या कृष्णभक्तांना हार्दिक शुभेच्छा!

Gokulashtami 2020 | File Photo

गोकुळमध्ये होता ज्याचा वास

गोपिकांसोबत ज्याने रचला रास

यशोदा, देवकी ज्याची मैय्या

तोच सार्‍यांचा लाडका  कृष्ण कन्हैय्या

श्रीकृष्ण  जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

via GIPHY

Gokulashtami 2020 | File Photo

कृष्ण ज्याचं नाव

गोकुळ ज्याचं धाम

अशा  भगवान श्रीकृष्णाला

कोटी  कोटी प्रणाम

कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Gokulashtami 2020 | File Photo

भारतामध्ये यंदा 11 ऑगस्टच्या मध्यरात्री 12 वाजून 21 मिनिटांपासून 1 वाजून 06 मिनिटांपर्यंत या वेळेत कृष्णजन्म साजरा होईल. तर 12 ऑगस्टला दहीहंडी, गोपाळकाला साजरा केला जाणार आहे. मात्र यंदा मुंबईमध्ये दरवर्षी रंगणारा दहीहंडीचा थरारक खेळ रंगणार नाही. अनेक आयोजकांनी दहीहंडी रद्द केली आहे.