Hanuman Jayanti 2019: तुलसीदास रचित 'हनुमान चालीसा' मध्ये सूर्य ते पृथ्वीच्या अंतरा बाबत आढळतो  विशेष उल्लेख (Watch Video)
Hanuman Jayanti (Photo Credits: @rpsingh/ Twitter)

"युग-सहस्र-योजन पर भानु, लील्यो ताहि मधुरा फलं जानु"। हनुमान चालिसाचे (Hanuman Chalisa)पठण करताना अनेकदा आपण हा श्लोक वाचला असेल पण याचा खरा अर्थ तुम्हाला ठाऊक आहे का? 19 एप्रिलला शक्तीची देवता (God Of Power) हनुमंताचा जन्मदिवस. हनुमान (lord Hanuman) जयंतीचा उत्सव साजरा करण्यासाठी देशभरातील अनेक मंदिरांमध्ये हनुमान चालिसाच्या पारायणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.

आजवर अनेक धार्मिक ग्रंथातून समोर आलेल्या ओव्या, श्लोक, उक्ती यांनी काळापलीकडे जाऊन वैज्ञानिक व शास्त्रोक्त माहिती समाजाला दिल्याचे आढळून आले आहे. त्यातीलच एक उदाहरण म्हणजे हनुमान चालीसाच्या मंत्रातील हा अठरावा श्लोक!

हनुमानाने सूर्याला फळ समजून खाण्यासाठी झेप घेतली या प्रसंगाचे वर्णन करणाऱ्या या श्लोकात तुलसीदासांनी पृथ्वी ते सूर्याच्या अंतराबद्दल माहिती दिली आहे. हनुमंताच्या शक्तीचं व लीलांचा वर्णन करणाऱ्या हनुमान चालीसाची निर्मिती संत गोस्वामी तुलसीदासांनी सोळाव्या शतकात केली होती. भक्तांना मनोबल देऊ करणाऱ्या चालिसेमुळे रामायणात हनुमानाला एका देवतेचे स्थान प्राप्त झाले असे ही सांगण्यात येते.

हनुमान चालिसा ही मूळ अवधी भाषेत लिहिलेली असली तरी आजवर जगभरातील अनेक भाषांमध्ये भाषांतरित करण्यात आली आहे.

हनुमान चालिसाच्या लिरीक्ससहित व्हिडियो पाहण्यासाठी

या श्लोकात सांगितल्या प्रमाणे सूर्य हा पृथ्वीपासून सहस्त्र योजन म्हणजेच हजारो मिल अंतरावर आहे. हिंदू वैदिक साहित्या नुसार एक युग म्हणजे 12 वर्ष, सहस्त्र म्हणजे एक हजार तर 1 योजन म्हणजे 8 मिल इतकं अंतर मानलं जातं. तर वैज्ञानिकांनी दिलेल्या माहिती प्रमाणे हे अंतर 147 मिलिअन (दशलक्ष ) इतके आहे. आजवर समोर आलेल्या रेकॉर्डस् प्रमाणे हे दोन गोष्टींमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक अंतर आहे.

पवनपुत्र हनुमानाने लहान असताना सूर्याला आंब्याचं फळ मानलं होतं, त्यामुळे एकदा खेळत असताना भूक लागली म्हणून मारुतीरायाने सूर्याला खाऊन टाकायचा विचार केला. मनीची इच्छा आणि पोटाची भूक भागवण्याकरिता त्याने थेट सूर्याच्या दिशेने झेप घेतली.

लाखो मैल अंतरावर असणाऱ्या सूर्याला खाण्याची इच्छा बाळगणाऱ्या बाल हनुमानाच्या भोळ्या स्वभावाची प्रचिती या श्लोकातून येते  याशिवाय हा श्लोक विज्ञानाच्या  कक्षेच्या पुढे जाऊन धार्मिक ग्रंथाची योग्यता पटवून देतो.