
फाल्गुन पौर्णिमा अर्थात हुताशनी पौर्णिमेचा दिवस म्हणजे होळी(Holi). यंदा भारतामध्ये 28 मार्चच्या रात्री होळी पेटवली जाणार आहे म्हणजेच होलिका दहन (Holika Dahan) आहे तर 29 मार्च दिवशी धुलिवंदनाचा (Dhulivandan) दिवस आहे. वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल देणारा हा सण जशी निसर्गात नवचैतन्याची, रंगांची बरसात करत असतो तशीच आनंदाच्या, सुखाच्या क्षणांची बरसात तुमच्या आमच्या आयुष्यात व्हावी यासाठी होळी साजरी केली जाते. रंग आणि पाण्यात भिजून होळीचा सण साजरा केला जातो. पण यंदा कोविड 19 संकटामुळे त्यावरही गंडांतर आले आहे. पण आनंदाचे रंग तुम्ही प्रत्यक्ष भेटून उधळू शकत नसलात तरीही या होळीच्या दिवशी सोशल मीडियात व्हॉट्सअॅप(WhatsApp), फेसबूक (Facebook), ट्वीटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram), टेलिग्राम(Telegram), हाईक (Hike) अशा विविध प्लॅटफॉर्म वर खास मराठमोळे होळीच्या शुभेच्छा देणारे मेसेज (Messages), संदेश, व्हॉट्सअॅप स्टेटस (WhatsApp Staus) शेअर करत होळी आणि धुलिवंदनाच्या सणाचा आनंद द्विगुणित करू शकता. Holika Dahan 2021 Date: यंदा कोणत्या तारखेला आहे होळी? कधी कराल होलीका दहन? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि त्याचे महत्व .
महाराष्ट्रात होळीच्या रात्री सुकलेल्या झाडा-पानांना एकत्र करून त्याची होळी बांधून पेटवलं जातं तर आबालवृद्ध या होळीच्या भोवती बोंबा मारत सार्या वाईट गोष्टी, अपप्रवृत्तीचा नाश व्हावा यासाठी प्रार्थना करतात. होळीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य करण्याची देखील प्रथा आहे. मग यंदा घरीच राहून पुरणपोळीवर ताव मारत व्हर्चुअल होळी सेलिब्रेशन करण्यासाठी सज्ज व्हा आणि लेटेस्टली मराठीने बनवलेली ही शुभेच्छापत्रं तुमच्या मित्रमंडळी, नातेवाईकांसोबत शेअर करा.
होळीच्या शुभेच्छा


रंगांची उधळण करत सण हा आला
होळी पेटता उठल्या ज्वाळा
वाईट प्रवृत्तींचा अंत हो झाला
सण आनंदे साजरा केला
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

हुताशनी पौर्णिमेची रात्र तुमच्या सार्या दु:खांचा नाश करो
आणि धुलिवंदनाचा दिवस नवरंगांची उधळण करो
याच होळीच्या दिवशी शुभेच्छा

फाल्गुन पौर्णिमेला येते होळी
नैवेद्याला पुरण पोळी
देता जोरात आरोळी
राख लावू कपाळी
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

होळी पेटू दे
द्वेष, मत्सर जळू दे
आगामी वसंत ऋतूत
तुमच्या आयुष्यात
सुख-समृद्धीची उधळण होऊ दे!
होळीच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा

होळी आणि धुलिवंदनाच्या
खूप खूप शुभेच्छा!
होळी हि पौर्णिमेच्या रात्री पेटवली तर दुसर्या दिवशी त्याच्याच राखेतून धुलिवंदनाचा सण साजरा करण्यासाठी सुरूवात केली जाते. ग्रामीण महाराष्ट्रात होळीच्या राखेने आंघोळ देखील केली जाते. तसेच त्यानंतर विविध रंगांनी एकमेकांना माखवून धुलिवंदन साजरा करण्याची प्रथा आहे.