World AIDS Day: कोरोना व्हायरसने संपूर्ण देशाला जितके हादरवून सोडले आहे तसाच एक आजार जगात याआधी अस्तित्वास आहे. त्या आजाराचे नाव आहे एड्स (HIV). या आजाराने रुग्णाला न केवळ शारीरिक पण मानसिकरित्याही खच्चीकरण केले. हा आजार झालेल्या व्यक्तीचे एक एक अवयव निकामी होते आणि शेवटी त्याचा मृत्यू होतो. म्हणूनच या आजाराबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी आज 1 डिसेंबर हा दिवस जगभरात जागतिक ए़ड्स दिन म्हणून साजरा केला जातो. 1988 पासून हा दिन साजरा केला जात आहे. यानिमित्त ठिकठिकाणी एड्सबाबत (AIDS) जनजागृती निर्माण करण्यासाठी कार्यक्रम होतात. रॅली काढली जाते. मात्र यंदा कोरोनामुळे मोठ्या संख्येने एड्सबाबत जागृती निर्माण करण्याचे कार्यक्रम होणार नसले तरीही आपण सध्याच्या एड्सची देशातील स्थितीबाबत आढावा घेऊ शकतो.
मेडिकल भाषेत HIV ला Human Immunodeficiency Virus असे म्हणतात. या आजारात HIV चा विषाणू माणसाच्या शरीरात गेल्याने त्याची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत करतो आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने माणसाचे शरीर कमकुवत बनवतो आणि परिणामी त्याचा मृत्यू होतो.हेदेखील वाचा- World AIDS Day 2019: जागतिक एड्स दिनानिमित्त जाणून घ्या कसा होतो हा आजार, याची लक्षणे आणि टाळण्याचे उपाय
जाणून घेऊया जगभरातील HIV संबंधीची आकडेवारी
- 2019 च्या आकड्यांनुसार, जागतिक स्तरावर 38 मिलियन लोक HIV बाधित आहेत.
- यातील 25.4 मिलियन लोक अँटीरेट्रोवायरल थेरपी पर्यंत पोहोचले आहेत.
- 1.7 मिलियन लोक 2019 मध्ये एचआयव्हीने संक्रमित होते.
- मागील वर्षी जगभरातील एड्स बाधित रुग्णांपैकी 6,90,000 लोकांचा मृत्यू झाला.
- महामारीच्या सुरुवातीला 32.7 मिलियन एड्स संबंधित आजाराने मृत्यूमुखी पडले आहेत.
- 36.2 मिलियन वयस्क लोक HIV संक्रमित आहे.
- 1.8 मिलियन लहान मुलांना या रोगाची लागण झाली आहे. जे 0 ते 14 वर्षादरम्यान आहे.
- 2010 नंतर HIV संक्रमित रुग्णांच्या संख्येत 23% घट झाली. 2010 नंतर 2.1 मिलियन असलेली रुग्णांची संख्या ही 2019 पर्यंत 1.7 मिलियनवर आली आहे.
- 2010 नंतर लहान मुलांमधील एड्सचा प्रार्दुभाव कमी होत गेला. ज्यात 52% घट झाली.
- 2010 पासून एड्स संबंधित मृत्यूदर 39% नी घटले.
प्रत्येक आठवड्यात 15-24 वयोगटातील जवळपास 5500 तरुण तसेच महिलांना एड्सची लागण होते. 15 ते 24 वयोगटातील तरुणांपेक्षा तरुणींना एचआयव्हीची लागण झाल्याची संख्या अधिक आहे.
भारताबाबत सांगायचे झाले तर, 2019 च्या रिपोर्टनुसार, भारतात जवळपास 23.49 लाख लोक एचआयव्ही बाधित आहेत. या रोगाविरुद्ध लढण्यासाठी देशात प्रभावी लस बनविण्याचे काम सुरु आहे. यासाठी सरकार राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम सुद्धा चालवत आहे. यातीन 2030 पर्यंत एड्स देशातून समूळ नष्ट होईल असा अंदाज वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे.