Ganeshotsav 2019: अष्टविनायक गणपती पालीचा बल्लाळेश्वर हे नाव कसे पडले? घ्या जाणून
Pali Ballaleshwar | (Photo Credits-Facebook)

Ganeshotsav 2019: अष्टविनायक गणपती (Ashtavinayak Ganpati) मालिकेत तिसऱ्या क्रमांकाने उल्लेख केला जाणारा गणपती म्हणजे रायगड (Raigad) जिल्ह्यातील पाली गावचा बल्लाळेश्वर. या गणपतीला पालीचा बल्लाळेश्वर (Pali Ballaleshwar) असेही म्हटले जाते. गणेश पुराणातही या गणपतीचा उल्लेख आढळतो. या गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे या बाप्पाला भक्ताच्या नावाने ओळखले जाते. हे एक स्वयंभू गणेशस्थान असल्याचे गणेशभक्त मानतात. या गणपतीबाबत एक पारंपरीक कथा सांगितली जाते की, बल्लाळ नावाचा एक गणेश भक्त होता. तो या गणपतीचा निस्सीम भक्ती करत असे. या भक्ताच्या नावावरुनच या गणपतीला बल्लाळेश्वर (Ballaleshwar) हे नाव पडले.

काही लोक मानतात की अष्टविनायक मालिकेत हा गणपती पाचव्या क्रमांकावर येतो. या गणपतीबाबत एक अख्याईकाही सांगितली जाते. ती आशी की, बल्लाळ नावाचा एक लहान मुलगा या गणपीतीचा भक्त होता. त्याची भक्ती पाहून गणपती बाप्पा प्रसन्न झाले. बल्लाळ नावाचा हा बाल गणेशभक्त गणपती म्हणून एका शिळेची पूजा करत असे. त्याची भक्ती पाहून गणपती बाप्पा शिळेत येऊन राहिले. तेव्हापासून हा परिसर गणेशक्षेत्र म्हणून ओळखला जाते. या गणेशाने आशीर्वाद दिला होता की, 'भाद्रपद शु. चतुर्थीला जे भक्त येथे येतील त्यांच्या शुभकामना मी पूर्ण करीन'. आपल्या भक्ताला मनोकामना पूर्ण करुन देण्याचा आशीर्वाद देणारा हाच तो बल्लाळ विनायक.

पाली गावात प्रवेश केल्यावर बल्लाळेश्वर मंदिर दर्शन घडते. या मंदिरात बल्लळेश्वराची मूर्ती आहे. ही मूर्ती स्वयंभू असल्याचे सांगितले जाते. या मंदिराचे बांधकाम चिरेंबंदी आहे. या मंदिराच्या भींती शिसं हा धातू ओतून मजबूत बनवल्या आहेत. मंदिराच्या मुख्य देवालयासमोर मंडप आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात असणाऱ्या बल्लाळेश्वराच्या मूर्तीबाबत बोलायचे तर ही मूर्ती 3 फूट उंचीची आहे. या मूर्तीची सोंड डाव्या बाजूला झुकलेली पाहायला मिळते. (हेही वाचा, Ganesh Chaturthi 2019 Pran Pratishtha Muhurat: गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पूजा कधी आणि कशी करावी यासाठी मदत करतील ही खास अ‍ॅप्स!)

गणपती विशेष व्हिडिओ

पालीच्या गणपतीला भेट द्यायची तर, हे स्थान खोपोली येथून 38 किमी आंतरावर आहे. पुणे शहरापासून हे आंतर 11 किलो मीटर आहे. खोपोली-पेन दरम्यानच्या रस्त्यातून पालीकडे जाण्यासाठी रस्ता फुटतो. तर, पनवेल-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाकण गावापासून पालीकडे जाण्यासाठई रस्ता आहे. महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण भारतभर या गणपतीची ख्याती आहे. त्यामुळे या गणपतीचे भावीक दर्शनासाठी गर्दी करतात.