Ganesh Chaturthi 2019 Pran Pratishtha Muhurat: गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पूजा कधी आणि कशी करावी यासाठी मदत करतील ही खास अ‍ॅप्स!
Ganpati Bappa Puja (Photo Credits: Commons.Wikimedia.Org)

Ganpati Pran Pratishtha Puja Vidhi:  यंदा गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) 2 सप्टेंबर दिवशी साजरी केली जाणार आहे. महाराष्ट्रासह जगभरात पसरलेले गणेशभक्त भाद्रपद शुक्ल चतुर्थी दिवशी गणेशाची मूर्ती घरात आणि सार्वजनिक मंडळांमध्ये विराजमान करून पुढील 10 दिवस गणेशोत्सव साजरा करतात. घरगुती गणेशोत्सव हा किमान दीड दिवस ते 5,7,10 दिवस साजरा केला जातो. गणेश मूर्तीची परंपरेनुसार, विधीवत प्राणप्रतिष्ठा (Ganpati Pran Pratishtha Puja) केली जाते. त्यानंतर षोडोपचार पुजा झाल्यानंतर गणपतीची मूर्ती भाविकांना दर्शनासाठी खुली केली जाते. या प्राणप्रतिष्ठेच्या पूजेसाठी अनेकजण भटजींकडून पूजा करून घेतात. मात्र आजकाल घरगुती गणपतींची संख्या वाढत असल्याने आयत्यावेळेस भटजींची शोधाशोध करताना अनेकांची गडबड उडते. पण आता डिजिटल युगामध्ये तंत्रज्ञान अद्यावत झाल्याने अनेक अ‍ॅपच्या मध्यमातून सारी पूजा रेकॉर्ड केलली आहे. मग पहा गूगल प्ले स्टोअरच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून घरच्या घरी गुरूजी किंवा पंडितजी शिवाय कशी कराल गणेश मूर्तिची प्राणप्रतिष्ठा?

प्राणप्रतिष्ठा पूजा ऑनलाईन कुठे उपलब्ध?

काही पंचांगांनी ऑनलाईन स्वरूपात त्यांच्या अ‍ॅपवर गणेश मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आवश्यक सारी गणेश पूजा रेकॉर्ड स्वरूपात उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार तुम्ही मुहूर्त पाहून तुमच्या सोयीनुसार, गणपतीची प्राणप्रतिष्ठा करू शकता. Ganesh Chaturthi 2019 Muhurat : गणेशाची पूजा कशी केली जाते, याची माहिती आहे का? मग जाणून घ्या गणेशोत्सवातील पूजा, महूर्त आणि महत्व

गुगल प्ले स्टोअर उपलब्ध अ‍ॅप्स

कालनिर्णय - https://bit.ly/32iSh4z

पितांबरी - https://bit.ly/2o0axOi

मोबाईल किंवा टॅबवर वरील पैकी कोणतेही अ‍ॅप डाऊनलोड करून तुम्ही प्राणप्रतिष्ठेची पूजा एकून साग्रसंगीत करू शकता.

2 सप्टेंबर रोजी पहाटे 5 वाजल्यापासून दुपारी 1 वाजून 52 मिनिटांपर्यंत कधीही श्रीगणेश मूर्ती स्थापना आणि पूजन करता येऊ शकते अशी माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली आहे.

आनंद पिंपळकर यांचा व्हिडिओ

गणपती ही विद्येची देवता आहे. गणेश चतुर्थी दिवशी त्याची विधीवत पूजा करून त्याला प्रसन्न केले जाते. कोणत्याही शुभ प्रसंगांमध्ये गणपती पूजेचा मान हा पहिला असतो. त्याच्या आशीर्वादाने दु:ख, समस्या, चिंता दूर होतात अशी अनेकांची भावना आहे.