Ganesh Chaturthi 2019 Muhurat : गणेशाची पूजा कशी केली जाते, याची माहिती आहे का? मग जाणून घ्या गणेशोत्सवातील पूजा, महूर्त आणि महत्व
गणेश चतुर्थी (Photo Credits: Pixabay)

Ganesh Chaturthi Pooja Muhurat : गणेशोत्सव (Ganesh Chaturthi 2019) हा हिंदू धर्मातील एक सार्वजनिक उत्सव (Festivals) आहे. भारतीय समाजामध्ये एकी असावी ह्या उद्देशाने बाळ गंगाधर टिळकांनी (Lokmanya Tilak) या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप आणले. ह्या उत्सवात गणपतीची पूजा केली जाते. हिंदू धर्माचे आराध्य दैवत असलेले विघ्नहर्ता गणरायाचे (Lord Ganesh) आगमन भाद्रपद शुद्ध चतुर्थीस होते. दरम्यान दहा दिवस मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा करण्यात येतो. गणरायाची मूर्ती स्थापित केल्यानंतर पूर्ण १० दिवस गणरायाची पूजा केली जाते. गणरायाची पूजा कशाप्रकारे केली पाहिजे, तसेच गणेश चतुर्थीचे काय महत्व आहे, याची योग्य माहिती जाणून घेऊया

गणेश चतुर्थीतील शुभ मुहूर्त-

गणरायाचे या वर्षी २ सप्टेंबर २०१९ ला आगमन होणार आहे. सकाळी ४. ५६ मिनिटापासून तिथिचे आरंभ होणार आहे. त्यानंतर मंगळवारी मध्यरात्री १.५३ मिनिटाने तिथी समाप्त होणार आहे. पूजेचे मुहूर्त सकाळी ११ वाजल्यापासून ते दुपारी १. ४२ मिनिटापर्यंत असणार आहे, याची भाविकांनी काळजी घ्यावी. हे देखील वाचा-Ganesh Chaturthi 2019: का साजरी केली जाते गणेश चतुर्थी, जाणून घ्या गणपती बाप्पाच्या जन्माची कहाणी

गणेशाची पूजा कशी केली जाते?

गणेशोत्सवाच्या निम्मिताने घरो-घरी तसेच सार्वजनिक ठिकाणी गणरायाची मूर्ती स्थापित केली जाते. ज्यांच्या घरात गणरायाचे आगमन केले जाते, अशा भाविकांनी लाल रंगाचा चौकट कपडा आथरुन त्यावर गणरायाची मूर्ती ठेवावी. पूजेत दुर्वा, जास्वंदी फूल, धूप-दीप, इतर आवश्यक गोष्टींचा समावेश करावा. गणरायाला गोड पदार्थ अधिक आवडतात, यामुळे मूर्तीसमोर मोदक आणि लाडू प्रसाद ठेवला पाहिजे. दिवसात दोन वेळा म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी गणरायाची आरती घ्यावी. अशाप्रकारे १० दिवस गणरायाची पूजा करावी. अनंत चतुर्थीच्या दिवशी गणरायाचे विसर्जन (Anant Chaturdashi) करावे.

गणेश चतुर्थीचे महत्व

गणरायाचे जन्म भाद्रपद महिन्याच्या शुद्र चतुर्थीस झाले. हिंदू धार्मिक पुस्तकात गणरायाबदल आधिक माहिती दिली गेली आहे. यानुसार गणरायाला बुद्धी, विद्या, विघ्नहर्ताचे प्रतीक मानले जाते. जे लोक गणरायाची मूर्ती स्थापित करुन पुजा करतात, अशा लोकांना चांगले ज्ञान प्राप्त होते. तसेच त्यांच्यावर असलेले विघ्नही टळतात, असा अनेकांचा समज आहे. या महिन्यात अनेक उपवास केले जातात. परंतु गणेश चतुर्थी त्यापैकी सर्वोत्तम उपवास म्हणून ओळखला जातो.