श्रावण महिना सरला की गणेशभक्तांची धामधूम सुरू असते ती गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) ते अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) अशा दहा दिवसांच्या गणेशोत्सवाच्या सोहळ्याची. यंदा 19 सप्टेंबरला गणपती विराजमान होणार आहेत आणि 29 सप्टेंबरला त्याचं विसर्जन होणार आहे. या दहा दिवसात घरगुती आणि सार्वजनिक गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यामध्ये, प्रसाद, साग्रसंगीत जेवणाचा आनंद घेण्यामध्ये तसेच पूजा अर्चना करून आरत्या म्हणत बाप्पाच्या भक्तीमध्ये तल्लीन होत वेळ कसा कधी कुठे जातो याचा पत्ताच नसतो. मग हे आनंदाचे दहा दिवस तुमच्या आप्तेष्टांसोबत घालवण्यासोबतच तुमच्या जवळ नसलेल्या अनेक मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना सोशल मीडीयामध्ये WhatsApp Status, Sticker, Wishes, Quotes, Messages, Greetings शेअर करून या सणाचा आनंद द्विगुणित करा. (हेही वाचा: गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पूजा कधी आणि कशी करावी? जाणून घ्या गणपती स्थापना मुहूर्त आणि विधी)
हिंदू धर्मीय कोणत्याही शुभ कामाची सुरूवात गणपती बाप्पाच्या आराधनेने करतात. मग अशा या मंगलमूर्तीच गणेश चतुर्थीचा सण देखील मोठ्या उत्सहात साजरा करा. मुंबई, पुणे शहरात घरगुती गणेशोत्सवासोबतच सार्वजनिक गणेशोत्सव देखील मोठ्या थाटामाटात साजरा करतात. रात्रभर भाविक सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये सहभागी होत बाप्पाचे आशिर्वाद घेतात. Ganesh Chaturthi Invitation Card Format Marathi: गणेशोत्सवात गौरी-गणपतीच्या दर्शनाला मित्रमंडळी, नातेवाईकांना आमंत्रित करण्यासाठी WhatsApp Messages च्या माध्यमातून शेअर करा निमंत्रण पत्रिका .
गणेश चतुर्थी मेसेजेस (Ganesh Chaturthi 2023 Messages In Marathi)
बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन…
गणपती बाप्पा मोरया!
गण्या धाव रे मला पाव रे,
तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे…
तू दर्शन आम्हाला दाव रे
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
फुलांची सुरुवात कळीपासून होते,
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,
आणि आपली कामाची सुरुवात
श्री गणेशा पासून होते
वंदितो तुज चरण आर्जव करतो गणराया
वरदहस्त असूद्या माथी
राहूद्या सदैव छत्रछाया
गणपती बाप्पा मोरया
श्रावण सरला, भाद्रपद चतुर्थीची पहाट आली
सज्ज व्हा फुले उधळायला गणाधीशाची स्वारी आली
गणपतीचा आवडता मोदक हा गणेश चतुर्थी निमित्त केल्या जाणार्या नैवेद्यामधील आकर्षण असतो. महाराष्ट्राच्या विविध भागात रीती रिवाजानुसार तळणीचे आणि उकडीचे मोदक केले जातात. त्यामुळे भक्तीमय वातावरणामध्ये हा सण भारतात मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरा केला जातो.