Ganesh Chaturthi 2023 Wishes In Marathi: गणेश चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा संदेश, WhatsApp Messages, Greetings, Quotes द्वारा शेअर करत स्वागत करा गणपती बाप्पाचं!
Ganesh Chaturthi | File Image

Ganesh Chaturthi Chya Hardik Shubhechha: गणेश भक्तांसाठी गणेशोत्सवाचे दहा दिवस मोठ्या जल्लोषाचे असतात. घरा-दारात सर्वत्र बाप्पाचं विलोभनीय रूप विराजमान झालेलं पाहून मन प्रसन्न होतं. सणाच्या धामधूमीत मनातील नकारात्मकता थोडी दूर सरते. सारेच बाप्पाच्या भक्तीमध्ये तल्लीन होतात. मग हा बाप्पाच्या आगमनाचा आनंद तुमच्या मित्रमंडळींसोबत, नातेवाईक, आप्तेष्टांसोबत WhatsApp Status, Wishes, Messages, Greetings सोबत शेअर करण्यासाठी लेटेस्टली टीम कडून तयार करण्यात आलेली ही शुभेच्छापत्रं तुम्ही नक्की शेअर करू शकता.

गणांचा 'ईश' असलेला गणपती बाप्पा हा 64 कलांचा आणि 16 विद्यांचा अधिपती आहे. श्रीगणेशाचे गुण आपल्या अंगी यावेत या धारणेमधून गणेशभक्त त्याची पूजा करतात. मग बाप्पाची ही सकारात्मकता किमान शुभेच्छापत्रांच्या माध्यमातून शेअर करायला विसरू नका. नक्की वाचा:  Ganesh Chaturthi Invitation Card Format Marathi: गणेशोत्सवात गौरी-गणपतीच्या दर्शनाला मित्रमंडळी, नातेवाईकांना आमंत्रित करण्यासाठी WhatsApp Messages च्या माध्यमातून शेअर करा निमंत्रण पत्रिका .

गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा (Ganesh Chaturthi 2023 Wishes In Marathi)

 

Ganesh Chaturthi Chya Hardik Shubhechha

मोदकांचा प्रसाद केला

लाल फुलांचा हार सजवला

मखर नटून तयार झाले,

वाजत गाजत बाप्पा आले

सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

Ganesh Chaturthi Chya Hardik Shubhechha

बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात

भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो,

हीच गणरायाकडे प्रार्थना!

गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…

Ganesh Chaturthi Chya Hardik Shubhechha | File Image

(हेही वाचा - गणेश चतुर्थी निमित्त Messages, Whatsapp Status, Wallpaper, Quotes द्वारे गणेश भक्तांना द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा!)

Ganesh Chaturthi Chya Hardik Shubhechha | File Image

महाराष्ट्रात गणेश चतुर्थीला गणेशमूर्तींचे पार्थिव पूजन करण्याची रीत आहे. यानिमित्ताने साग्रसंगीत जेवण, उकडीचे मोदक केले जातात. अनेकजण मित्रमंडळी, नातेवाईकांकडे हमखास बाप्पाच्या दर्शनाला जातात. किमान दीड दिवस ते 5,7, 10 दिवस बाप्पा घराघरात, सार्वजनिक मंडपात विराजमान असतात.