
Happy Ganesh Chaturthi 2023 Wishes in Marathi: हिंदू दिनदर्शिकेनुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला 19 सप्टेंबरपासून देशभरात गणेश चतुर्थी हा सण साजरा केला जाईल. भगवान गणेशाला समर्पित हा उत्सव गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांमध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक घरात गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत. हा उत्सव प्रामुख्याने 10 दिवस चालेल, जो अनंत चतुर्दशीला म्हणजेच 28 सप्टेंबर 2023 रोजी संपेल.
हिंदू धर्मात या दिवसाला विशेष महत्त्व आहे. पौराणिक मान्यतेनुसार गणेशाला प्रथम देव मानले जाते. यामुळेच कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाची पूजा केली जाते. या दिवशी गणेशाचा पुनर्जन्म झाल्याचे हिंदू धर्मात मानले जाते. म्हणून हा दिवस गणेशोत्सव म्हणून साजरा केला जातो. तर लोकमान्य टिळकांनी सामाजिक भेद नष्ट करण्यासाठी हा सण महत्त्वाचा असल्याचे सांगितले. गणेशोत्सवानिमित्त लोक एकमेकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून खास शुभेच्छा देतात. आम्ही तुमच्यासाठी गणेश चतुर्थीच्या खास मराठमोळ्या शुभेच्छापत्र घेऊन आलो आहोत. तुम्ही हे शुभेच्छापत्र आपल्या मित्र-परिवारास पाठवून त्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देऊ शकता. (हेही वाचा - गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा WhatsApp Messages, Greetings, Quotes द्वारा शेअर करत स्वागत करा बाप्पाचं!)
मोदकांचा केला प्रसाद
केला लाल फुलांचा हार
मखर झाले नटून तयार
आले वाजत गाजत बाप्पा
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या आगमनासाठी जमले सगळे
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

बाप्पाच्या आगमनला
सजली सर्व धरती
नसानसात भरली स्फुर्ती
आतुरता आता फक्त बाप्पाच्या आगमनाची
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया…!!!

गणेश चतुर्थीचा दिवस आहे खास
लंबोदराचा घरात आहे निवास
दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया!

आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना
मनःपूर्वक शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया...

गणेश चतुर्थीच्या दिवशी लोक मोठ्या थाटामाटात विघ्नहर्ता आपल्या घरी आणतात आणि त्याची प्रतिष्ठापना करतात. या दिवशी श्रीगणेशाची विधिवत पूजा केली जाते. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीपासून सुरू होणारी गणेश चतुर्थी दहाव्या आणि शेवटच्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीला संपते. या दिवशी आरती, भजन आणि गीते गात गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते.