Diwali Special : दिवाळी बोनस देण्याची प्रथा अशी झाली सुरू...
दिवाळी बोनस Photo Credit : IANS)

दिवाळी हा हिंदू धर्मातील सगळ्यात मोठा आणि अत्यंत उत्साहाचा सण आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात दिवाळीची धामधूम मोठ्या प्रमाणात असते. रंगबेरंगी कंदील, तोरण, दिव्यांची आरास, फटाके आणि फराळाची रेलचेल असल्याने सर्वत्र चैतन्याचं वातावरण असतं. चिमुकल्यांना दिवाळीच्या दिवसात सुट्ट्यांचं आकर्षण असतं तर चाकरमान्यांचे डोळे दिवाळी बोनसकडे लागलेले असतात. दरवर्षी सरकारी कर्मचार्‍यांपासून अनेक कॉरपरेट विश्वातील ऑफिसमध्ये दिवाळीच्या पगारासोबत बोनस देण्याची प्रथा आहे. पण हा बोनस केवळ दिवाळीच्या दिवसातच का बरं दिला जातो ? हा प्रश्न तुम्हांला कधी पडलाय का? मग दिवाळी बोनसमागील ही रंजक कहाणीदेखील जाणून घ्या. नक्की वाचा :  दिवाळीत सलग 5 दिवस बँकांना सुट्टी ; यापूर्वीच उरका महत्त्वाची कामे

कशी सुरू झाली दिवाळी बोनसची प्रथा ?

भारतामध्ये पूर्वीच्या काळी राबणार्‍या कामगाराला त्याच्या कामाचा मोबदला म्हणून दर आठवड्याला पगार दिला जात असे. मात्र इंग्रज जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी आठवड्याऐवजी इंग्रजी महिन्याप्रमाणे पगार देण्याची प्रथा सुरू केली. भारतीयांना आठवड्याच्या पगाराच्या हिशोबानुसार 52 आठवड्यांचा पगार मिळत होता. एका महिन्यात 4 आठवडे असतात. या नियमानुसार वर्षभराच्या पगाराची आखणी केली तर तो वर्षात 13 महिन्यांचा पगाराचा असायला हवा. मात्र इंग्रजांच्या पगार धोरणानुसार बारा महिन्याचा पगार मिळत असे.

कामगारांना जेव्हा पगाराचं गणित समजलं तेव्हा महाराष्ट्रात कामगारांनी 13 महिन्यांचा पगार मिळावा याकरिता मागणी, निदर्शन करण्यात आली, इंग्रज सरकारनेही या मागणीची दखल घेतली आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. हा पगार कसा द्यायचा हे ठरवताना दिवाळी हा भारतीय संस्कृतीतील मोठा सण असल्याने या सणाच्या आधी एक पगार द्यायचे इंग्रज सरकारने ठरवले. तो पगार म्हणजे दिवाळी बोनस. धनतेरसच्या दिवशी 'या' 4 वस्तूंची खरेदी कराल तर घरात पसरेल सुख, समुद्धी आणि पैसा !

30 जून 1940 साली ही पगार देण्याची ही पद्धत भारतीय अर्थव्यवस्थेसोबत मेळ घालून बसवण्यात आली, त्याचा कायदा लागू करण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना 2500, तर अधिकाऱ्यांना 5 हजार दिवाळी बोनस जाहीर