Diwali 2018 : धनतेरसच्या दिवशी 'या' 4 वस्तूंची खरेदी कराल तर घरात पसरेल सुख, समुद्धी आणि पैसा !
धनत्रयोदशी किंवा धनतेरस Photo Credits : Facebook

दिवाळीच्या दिवसामध्ये धनत्रयोदशीचं विशेष महत्त्व असतं. यादिवशी चांगल्या आरोग्यासाठी धन्वंतरीची या आरोग्यरक्षक देवतेची पूजा केली जाते. सोबतच रोषणाईचा सण म्हणून ओळखा असलेल्या दिवाळीच्या सणामध्ये घरात सुख,समृद्धी आणि पैसा नांदत रहावा म्हणून विशेष प्रार्थना केली जाते. घरात लक्ष्मीने प्रवेश करावा यासाठी घरातील प्रत्येक कोपरा साफ करण्याची प्रथा आहे. मग पहा धनतेरसच्या दिवशी कोणकोणत्या वस्तू घरात आणणं हे शुभ समजलं जातं.

घरात सुख - समृद्धी वाढवतात या काही गोष्टी -

1. झाडू -

झाडू हे लक्ष्मीचं एक प्रतिक समजलं जातं. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूचीदेखील पूजा करण्याची प्रथा आहे. यामुळे घरात लक्ष्मी प्रसन्न राहते. म्हणूनच धनतेरसच्या दिवशी झाडू खरेदी करा.

2. सोन्या-चांदीच्या वस्तू -

धनतेरस हा सोनं, चांदी खरेदी करण्यासाठी एक उत्तम अअणि शुभ दिवस मानला जातो. या दिवशी सोन्या, चांदीच्या स्वरूपात कोणतीही वस्तू विकत घेणं हा पुढील काळासाठी आर्थिक सुसंपन्नतेची नांदी समजली जाते.

3. शंख -

अनेकजण देवघरात शंखाची पूजा करतात. ज्योतिषशास्त्रानुसार धनतेरस आणि लक्ष्मीपूजन या दिवशी शंखनाद करणं शुभ आहे. यामुळे घरात सुख, शांती, समृद्धी पसरते. सोबतच घरामध्ये लक्ष्मी प्रसन्न व्हावी याकरितादेखील शंखनाद केला जातो.

4. लक्ष्मी किंवा गणेशमूर्ती

धनतेरसच्या दिवशी घरात लक्ष्मी किंवा गणेशमूर्ती आणणं हे शुभ मानलं जातं. यामुळे घरात विद्या, पैसा, विनाशी संकटांचा नाश करण्याची क्षमता बळावते. गणपती हा विघ्नांचा हर्ता आहे. त्यामुळे गणपतीची मूर्ती विकत घेणं फायदेशीर आहे.

यंदा धनतेरस हा सण 5 नोव्हेंबरला आहे. या दिवशी घरी सोन्याची खरेदी करा. सोन्यासारख्या तुमच्या आयुष्यात मौल्यवान असणार्‍या प्रियजनांच्या घरी भेट द्या. आणि त्यांना भेटवस्तूच्या स्वरूपात नेमकं काय द्यावं हा प्रश्न पडला असेल तर नक्कीच या '7' हटके दिवाळी गिफ्ट आयडियाजमधून मनपसंतीचे पर्याय निवडा.