दिवाळी गिफ्ट Photo Credits: pexels.com

दिवाळी हा भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणारा एक सण आहे. घरात रोषणाई, मांगल्याचं पण तरीही चैतन्याचं वातावरण दिवाळीच्या दिवसात असते. फटाके, नवे कपडे, फराळ सार्‍याची लगबग असते. पण यासोबतीने येणारी एक गोष्ट म्हणजे दिवाळीतील गिफ्ट.. नातेवाईकांना सामान्य भेट ते पाडवा आणि भाऊबीजेला नेमकं काय द्यावं ? हा प्रश्न दरवर्षी सतावत असतो. मग पहा यंदाची दिवाळी तुमच्या प्रियजनांसाठी खास करायची असेल तर गिफ्टमध्ये कोणकोणत्या हटके वस्तू देऊ शकता?

1. सुगंधी अत्तरं, रूम परफ्युम्स

आजकाल घरं बंद आणि लहान होत चालल्याने पूर्वीप्रमाणे तेलाच्या पणत्यांची जागा वॅक्स कॅडल्सने घेतली आहे. आजकाल बाजारात सुगंधित कॅडल्स, लॅम्प्स आले आहेत. यामुळे तुम्ही सुगंधित लॅप्स गिफ्ट म्हणून देऊ शकता. हे दिवे पेटवल्यानंतर आपोआपच त्याद्वारा घरात सुगंध पसरेल.

2. फ़ीटनेस वॉच

आजकाल अनेक विविध स्वरूपात फीट बीट्स मिळतात. त्यामुळे मनगटावर केवळ घड्याळचं नव्हे तर तुमच्या लाईफस्टाईलचं एक खास मोजमाप यंत्रच असतं. तुम्ही किती पावलं चाललात ? किती वेळ झोपलात? एकाच जागी किती वेळ बसून राहता ? याकडे लक्ष दिले जाते. तसेच तुम्हांला सूचितही केले जाते. आजकाल एकाच जागी बसून राहिल्यनं लाईफस्टाईलशी निगडीत अनेक आजार जडण्याचं प्रमाण वाढलं आहे.

3. सुकामेवा

मधल्या वेळेत लागणार्‍य भूकेवर आपण अनेकदा वेफर्स, वडापाव, चहाअ, कॉफी अशा पेयांनी भूक मारण्याचा प्रयत्न करतो. मात्र मधल्या वेळेतील भूक नियंत्रणात ठेवायची असेल तर मूठभर सुकामेवा खाणं फायदेशीर आहे. मात्र एखाद्याला मधुमेहासारख्या आहाराचं पथ्यपाणी सांभाळणं आवश्यक असे आजार असल्यास सुकामेवा खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. मिठायांवरील चांदीचा वर्ख भेसळयुक्त तर नाही ना ? या'4' सोप्या टेस्टने घरच्या घरीच ओळखा

4. सोनं किंवा चांदीचं वळ, नाणं

सोन्याचं नाणं किंवा वळ हे दिवाळीच्या दिवसात धनतेरस किंवा पाडव्या दिवशी विकत घेणं शुभ समजलं जातं. ही एका प्रकारची इन्व्हेसमेंट आहे. त्यामुळे तुमच्या प्रियजनांना नेमका कोणता दागिना घ्यावा? हा प्रश्न पडला असेल तर थेट वळ किंवा नाणं द्यावं. म्हणजे समोरच्या व्यक्ती त्यांच्या कुवती आणिसवडीप्रमाणे त्यापासून दागिना बनवू शकते. पाडव्याच्या ओवाळणीत पत्नीला गिफ्ट देण्यासाठी '5' हटके आयडियाज !

5. गॅजेट्स

आजकाल बदलत्या टेक्नॉलॉजीमुळे आपलं आयुष्यातील अनेक लहान सहान गोष्टी सुलभ झाल्या आहेत. म्हणूनच यंदा दिवाळीचं औचित्य साधून तुम्ही प्रियजनांना हटके आणि फंकी अंदाजातील हेडफोन्स, वायरलेस हेडफोन्स, पोर्टेबल चार्जर देऊ शकता.

6. कस्टमाईज्ड पासपोर्ट कव्हर्स

तुमची आवडती व्यक्ती ट्रॅव्हलर असेल तर त्यांच्या आवडीप्रमाणे, त्यांचं नाव एम्बॉस केलेली काही पासपोर्ट कव्हर्स, बॅग टॅग्स, ट्रॅव्हल पाऊच भेट म्हणून देऊ शकता. यामध्ये पासपोर्ट, तिकीट, बोर्डिंग पास नीट ठेवण्यासाठी खास कप्पे असतात.

7. गिफ्ट कार्ड्स

तुम्हांला अगदीच काय घ्यावं ? हा प्रश्न पडला असेल तर थेट गिफ्ट कार्ड्स विकत घ्या. आवडीच्या ब्रॅन्डचं, स्टोअरचं गिफ्ट कार्ड तुम्हांला भेट स्वरूपात देता येऊ शकतं. गिफ्ट कार्ड हा अगदीच सुरक्षित मार्ग आहे. यामुळे तुम्हांला गिफ्ट दिलेली वस्तू आवडेल का ? हा प्रश्न सतावणार नाही.