Diwali 2018 : मिठायांवरील चांदीचा वर्ख भेसळयुक्त तर नाही ना ? या'4' सोप्या टेस्टने घरच्या घरीच ओळखा
भेसळयुक्त मिठाया खाणं जीवावर बेतू शकतं.. म्हणूनच या टेस्टने घरच्या घरीच ओळखा त्याचा धोका
दिवाळीचा सण म्हटला की गोडा-धोडाच्या पदार्थांची भेटवस्तू देणे आलंचं. अनेकदा भेटवस्तूंच्या स्वरूपात किंवा दिवाळी पाडवा, भाऊबीज या दिवशी गोडाचा पदार्थ भरवण्यासाठी बाजारातून विकतची मिठाई आणली जाते. आजकाल मिठायांना आकर्षक रूप देण्यासाठी सोन्या,चांदीचा वर्ख लावला जातो. परंतू सणाच्या पार्श्वभूमीवर मिठायांमध्ये भेसळ करण्याचं प्रमाणही वाढलं आहे.
भेसळयुक्त मिठाईमुळे विषबाधेपासून ते अगदी मळमळणं, उलट्या होणं, जुलाब होणं अशा समस्या प्रामुख्याने आढळातात. मिठाई खाणं जीवावर बेतणं टाळण्यासाठी तुम्ही थोडं सतर्क राहणं गरजेचे आहे. प्रामुख्याने केवळ आकर्षाचा भाग म्हणून मिठायांवर लावलेला चांदीचा वर्ख भेसळयुक्त तर नाही ना ? हे ओळखण्यासाठी काही साध्या सोप्या ट्रीक्स मदत करू शकतात.
भेसळयुक्त चांदीचा वर्ख घरच्या घरी कसा ओळखाल ?
1. मिठाईवरून केवळ बोट फिरवलं तरीही तुम्हांला चांदीचा वर्ख भेसळयुक्त आहे की नाही ? याची माहिती मिळू शकते. जर तुमच्या बोटाला चांदीचा वर्ख लागला तर समजा तो अॅल्युमिनियमयुक्त आहे.
2.चांदीच्या वर्खाचा छोटासा तुकडा जाळला तरीही तुम्हांला तो भेसळयुक्त आहे की नाही ? याची माहिती मिळू शकते. जाळल्यानंतर जर तो भेसळयुक्त असेल तर काळसर होतो. मात्र चांदीचा वर्ख अस्सल तर तो गरम केल्यानंतर एकत्र जोडून बॉल तयार होतो. भेसळयुक्त चांदीच्या वर्खात अॅल्युमिनियमची भेसळ असल्यास ती काळी पडू शकते.
3. चांदीचा वर्ख तुम्ही घरी आणून मिठायांवर लावणार असाल तर थोडी काळजी घ्या. तो भेसळयुक्त असल्याची तुम्हांला शंका आल्यास तो दोन्ही हाताच्या तळव्यांमध्ये धरा आणि चोळा. चांदीचा वर्ख असल्यास तो तुमच्या हाताला लागेल मात्र जर त्यामध्ये अॅल्युमिनियम असेल तर त्याचा गोळा होईल.
4. चांदीच्या वर्खावर hydrochloric acidचे काही थेंब टाका. चांदीचा वर्ख अस्सल तर तो गढूळ होतो. मात्र तो अॅल्युमिनियमयुक्त असेल तर तो गढूळही होत नाही आणि त्याचे अवशेषही खाली राहत नाहीत. Diwali 2018 : दिवाळीच्या उत्साहात हेल्दी राहण्यासाठी खास '6' टिप्स !
(The above story first appeared on LatestLY on Nov 08, 2018 04:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

