दिवाळी गिफ्ट (File Photo)

दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. दिवाळी येणार म्हटल्यावरच सगळे वातावरणच आनंदी, उत्साही होते. दिवाळीत आकाशकंदील, दिवे, रांगोळी, फराळ आणि गिफ्ट या सगळ्याची रेलचेल असते. आता दिवाळी काहीच दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळीच्या निमित्ताने गिफ्टची देवाण घेवाण होतेच.

दिवाळीतील पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीला ओवाळते आणि पती ओवाळणीत तिला काहीतरी छानसे गिफ्ट देतो, अशी आपल्याकडे प्रथा आहे. पण पत्नीला नेमके काय गिफ्ट द्यावे, हा प्रश्न अनेक पुरुषांना पडतो. पुरुषांच्या मनातील हाच संभ्रम दूर करण्यासाठी काही हटके गिफ्ट आयडियाज...

सुंदरसा दागिना अन् तिला स्पेशल वाटेल

प्रत्येक महिलेला ज्वेलरी आवडते. ज्वेलरी, दागिने न आवडणारी महिला दुर्मिळच असले. त्यामुळे ज्वेलरीमध्ये तुम्हाला गिफ्ट करण्यासाठी खूप पर्याय मिळू शकतात. पाडव्याला सोन्याचा एखादा छानसा दागिना तुम्ही पत्नीला गिफ्ट करु शकता. यातही तुमच्याकडे पर्याय आहेत. तिला जर हिरे आवडत असलीत तर हिऱ्याची रिंग, पेंडन्ट गिफ्ट करु शकता. तुमचा लग्नानंतरचा पहिलाच पाडवा असेल तर काहीतरी खास गिफ्ट देऊन तो क्षण अविस्मरणीय बनवा.

सोने किंवा हिऱ्याचे दागिने तिला आवडत नसतील जंक ज्वेलरीचा पर्याय तुमच्याकडे आहे. छानशा बॉक्समधील सुंदर दागिना पाहुन तिला नक्कीच स्पेशल वाटेल.

शॉपिंग व्हाऊचर

महिलांसाठी गिफ्ट घेताना अनेक पुरुषांचा गोंधळ उडतो. तिला नक्की काय आवडेल? मी दिलेलं गिफ्ट तिला आवडेल ना? असे अनेक प्रश्न डोक्यात असतात. या गोंधळापासून तुम्हाला दूर राहायचे असल्यास तिला तिच्या आवडीने शॉपिंग करण्याची संधी तुम्ही देऊ शकता.

तुम्हाला जर तुमच्या पत्नीची चॉईस कळत नसेल किंवा तिला नेमके काय द्यावे, हा प्रश्न सतावत असेल तर तुम्ही शॉपिंग व्हाऊचर गिफ्ट करु शकता. फक्त आपल्या बायकोला जास्त काय आवडते याकडे थोडे लक्ष द्या. म्हणजे ती फॅशनिस्टा असेल तर फॅशन अॅक्सेसरीजचे व्हाऊचर तुम्ही गिफ्ट करु शकता. तिला जर वाचनाची आवड असेल तर बुक स्टोरचे व्हाऊचर गिफ्ट करणं हा चांगला पर्याय ठरेल.

इलेक्ट्रोनिक वस्तू

स्त्री कितीही मॉडर्न असली तरी तिचे स्वयंपाकघरावर विशेष प्रेम असते. त्यामुळे स्वयंपाकघरात कामी येणाऱ्या वस्तू पाडव्याला गिफ्ट करणे हा एक उत्तम पर्याय ठरु शकतो. या वस्तू पत्नीला नक्कीच कामी येतील. उदा. मिक्सर, फूड प्रोसेसर, इत्यादी.

त्याचबरोबर गिफ्ट खास पत्नीसाठीच असावे, असे जर तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही (पत्नी वापरत असल्यास) हेअर स्ट्रेटनरसारख्या वस्तू गिफ्ट करु शकता. ऑनलाईन तुम्हाला गिफ्टचे अनेक पर्याय उपलब्ध होतील.

स्पा पॅकेज

घर, ऑफिस, संसार अशी तारेवरची कसरत महिला नेहमी करत असतात. त्यामुळे अनेकदा त्यांना स्वतःसाठी वेळ मिळत नाही. तिला स्वतःचा वेळ मिळावा, तिने स्वतःकडे लक्ष द्यावे, असे जर तुम्हाला वाटत असेल तर स्पा पॅकेजचा हा पर्याय उत्तम आहे. अनेक स्पा पॅकेजेस ऑनलाईन देखील उपलब्ध आहेत.

पर्सनलाईज गिफ्ट आयट्मस

पर्सनलाईज गिफ्ट आयट्मसचे अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. फोटो फ्रेम्स, तिच्या सेल्फीच्या कोलाजची फ्रेम, फोटो, नाव किंवा छानसा संदेश असलेला कॉफी मग, पिलो अशा अनेक गोष्टी तुम्ही गिफ्ट करु शकता. तुमच्या पत्नीच्या आवडीनुसार तुम्ही या गिफ्टची निवड करु शकता.