दिवाळीत बँकांना सगल पाच दिवस सुट्टी असल्याने नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. बुधवारी 7 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन, गुरुवारी 8 नोव्हेंबरला दिवाळी पाडवा आणि शुक्रवारी 9 नोव्हेंबरला भाऊबीज असल्याने बँका बंद राहणार आहेत. त्यानंतर शनिवारी 10 तारखेला दुसरा शनिवार असल्याने बँकांना सुट्टी असेल. त्यानंतर 11 नोव्हेंबरला रविवारची सुट्टी असेल. त्यामुळे सलग 5 दिवस बँका बंद राहतील. म्हणून महत्त्वाची कामे त्यापूर्वी करुन घ्या. तसंच सलग 5 दिवसांच्या सुट्टीनंतर बँकांमध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे लोकांची एकच धांदल होऊ शकते.
दिवाळीचे दिवस असल्याने एटीएम मधून पैसे काढण्याचे प्रमाण वाढेल आणि त्यात सलग 5 दिवसांची सुट्टी यामुळे एटीएममध्ये खडखडाट होऊ शकते. त्यामुळे एटीएममधून वेळीच पैसे काढून ठेवा, असे सांगण्यात आले आहे. अन्यथा ऐन दिवाळीत तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामोरे जावे लागू शकते. त्याचबरोबर दिवाळीत ट्रिपला जाणाऱ्या मंडळींनीही पूर्वीच पुरेसे पैसे काढून ठेवावेत, त्यामुळे ऐन वेळी होणारी तारांबळ टाळता येईल.