Diwali 2018 : धनतेरस दिवशी सोनं, चांदी, भांडी विकत घेण्याची शुभ वेळ कोणती ?
सोनं खरेदी (Photo Credits: Instagram)

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. धनतेरसपासून दिवाळी सेलिब्रेशनला महाराष्ट्रभरात सुरूवात होणार आहे. या काळात प्रत्येकजण आपल्या कुवतीनुसार सोन्या, चांदीच्या वस्तूंची खरेदी करतात. पाडव्याला अनेकदा ओवाळणीमध्ये सोन्याचा दागिना बायकोला भेट म्हणून दिला जाते. धनतेरस हा सोन्या-चांदीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी शुभ दिवस मानला जातो.

धनत्रयोदशी या दिवसाच्या नावातच 'धन' आहे. धन या शब्दाचा अर्थ पैसा. धनत्रयोदशीदिवशी कुबेराची पुजा करून घरात पुढील वर्षभराच्या काळासाठी आर्थिक चणचण भासू नये म्हणून प्रार्थना केली जाते. काही लोकांकाडे या यादिवशी गणेशमूर्ती आणि लक्ष्मी मूर्तीदेखील आणली जाते. पावित्र्याचा, चैतन्याचा हा दिवस द्विगुणित करण्यासाठी या दिवशी घरात शुभ मुहूर्तावर सोन्या, चांदीची खरेदी केली जाते. Diwali 2018 : दीर्घायुष्यासाठी धनतेरसच्या दिवशी यमदीपदान का केले जाते ?

पुष्य नक्षत्र हे सोनं खरेदीसाठी पवित्र आणि लक्ष्मीचा प्रभाव असलेलं नक्षत्र आहे. सोन्याची वळी, नाणं, दागिने यासोबतीनेच अनेकजण चांदीच्या वस्तू, नाणं, चमचे विकत घेतात. तर समाजाच्या काही भागात धनतेरसच्या दिवशी एखादं भांडं घेणंदेखील शुभ समजलं जातं. यंदा दिवाळीच्या पहिल्या दोन दिवसात म्हणजे 4 आणि 5 नोव्हेंबर या दिवसात सोनं खरेदी करणं फायदेशीर आहे.  Diwali 2018 : धनतेरसच्या दिवशी 'या' 4 वस्तूंची खरेदी कराल तर घरात पसरेल सुख, समुद्धी आणि पैसा !

दिवाळीमध्ये कोणत्या मुहूर्तावर सोनं, चांदी घेणं शुभ समजलं जातं ?

वसूबारस 4 नोव्हेंबर

रात्रीचा मुहूर्त – 01:58 am ते 03:33 am

पहाटेचा मुहूर्त – 05:09 am ते 06:44 am

धनत्रयोदशी 5 नोव्हेंबर

सकाळचा मुहूर्त – 06:44 am ते 08:09 am आणि 09:33 am ते 10:57 am

संध्याकाळचा मुहूर्त – 01:46 pm ते 07:35 pm

रात्रीचा मुहूर्त – 10:47 pm ते 11:46 pm

धनत्रयोदशी दिवशी विकत घेतल्या जाणार्‍या सोन्या, चांदीच्या नाण्यांवर श्री किंवा लक्ष्मीचा फोटो एम्बॉस करून विकत घेतला जाते. धनतेरसच्या पूजेमध्ये सोन्या, चांदीची ही नाणी पूजेसाठी ठेवली जातात. Diwali 2018 : धनतेरस साजरी करण्यामागे कारण काय ? धनरतेरस पूजा, विधी आणि शुभ मुहूर्त