दिवाळी हा रोषणाईचा आणी हिंदू संस्कृतीतील एक मोठा सण आहे. 5 दिवस चालणार्या या सणामध्ये प्रत्येक दिवशी काही खास असते. आपल्या सणांमध्ये केवळ सेलिब्रेशन नाही तर रीती-रिवाज हे संस्कारांमध्ये बांधले आहेत. त्यामुळे आरोग्याच्यादृष्टीनेही भरातीय सण साजरे करणे हितावह आहे. मात्र बदलत जाणारी लाईफस्टाईल आणि त्यातून होणार्या बदलांमुळे आज सणांचेही स्वरूप बदलत जात आहे.
धनतेरस किंवा धनत्रयोदशी या सणादिवशी यमदीपदान करण्याची प्रथा आहे. दिवाळीच्या दिवसात घरात रोषणाई आणि दिव्याची आरास केली जाते. मात्र यमदीपदान हे काही गोष्टींमुळे अत्यंत खास आहे. यमदीपदान करून पुढील वर्षभरासाठी अपमृत्यू होण्याचं संकट टळावे याकरिता प्रार्थना केली जाते.
कसे केले जाते यमदीपदान
दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. या दिशेकडून घातक लहरी प्रवाहीत होत असतात त्यामुळे त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम टळावा याकरिता कणकेचा दिवा दक्षिण दिशेला लावला जातो. या दिव्यामध्ये तीळाचे तेल प्रामुख्याने वापरलं जातं.
जीवाचा मृत्यूकाळ हा 13 दिवसांच्या कालचक्रांचा असतो. म्हणजेच मृत्यूनंतर जीव भूलोकातून परलोकात जाण्यासाठी 13 दिवसांचा वेळ घेतो. म्हणूनच मृत्यूनंतर 13 दिवसांनी श्राद्ध घालण्याची प्रथा आहे. दिवाळीच्या दिवसातही यमलहरींच्या प्रभावामुळे अकालमृत्यू येऊ नये म्हणून त्रयोदशीदिवशी यमदीपदान केले जाते. नक्की वाचा : दिवाळीत नरकचतुर्दशी दिवशी अभ्यंगस्नान का केले जाते?
धनतेरसच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर कणकेचा दिवा दक्षिणेला ठेवा. आणि तुमच्यासह कुटुंबीयांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करा. असे सांगितले जाते. धनतेरसच्या दिवशी 'या' 4 वस्तूंची खरेदी कराल तर घरात पसरेल सुख, समुद्धी आणि पैसा !