Dr. BR Ambedkar | (Photo Credit: File Photo)

64th Dhamma Chakra Pravartan Din:   बौद्ध बांधवांसाठी 14 ऑक्टोबर हा दिवस खास असतो. या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर जाऊन बौद्ध धर्म स्वीकारला. त्यामुळे भीम अनुयायींसाठी हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन (Dhammachakra Pravartan Day) किंवा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन (DhammaChakra Anupravartan Din) म्हणून विशेष असतो. दलित समाजासाठी आपलं आयुष्य वेचणार्‍या, त्यांच्या विकासासाठी, समतेसाठी काम करणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान फार मोलाचं आहे. मगा यंदाच्या 64व्या धम्म चक्र प्रवर्तन दिनी समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले काही प्रेअरणादायी विचार सोशल मीडीयात व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस, स्टेटस, फेसबूक मेसेंजर, ट्वीटर, इंस्टाग्राम यांच्या माध्यमातून शेअर करून त्याच्याप्रती आदर करायला विसरू नका. Dhamma Chakra Pravartan Din 2020 Messages: धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मराठी शुभेच्छा, WhatsApp Status, SMS, Wishes, GIFs, Images च्या माध्यमातून देऊन साजरा करा आजचा दिवस.

 

14 ऑक्टोबर 1956 साली नागपूर येथील दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या काही सोबती, अनुयायींसोबत नवयान बौद्ध धर्म स्वीकारला होता. बौद्ध धर्मियांच्या मान्यतांनुसार, भारतामध्ये लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचं चक्र बाबासाहेबांनी गतिमान करत 'धम्मचक्र प्रवर्तन' केले म्हणून हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून ओळखला जातो. ( नक्की वाचा: Dhammachakra Pravartan Day 2020 Date: धम्मचक्र प्रवर्तन दिन 14 ऑक्टोबर दिवशी साजरा करण्यामागील महत्त्व, इतिहास काय?).

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार

 

Babasaheb Ambedkar Quotes In Marathi (Photo Credits: File Image)
Babasaheb Ambedkar Quotes In Marathi (Photo Credits: File Image)
Babasaheb Ambedkar Quotes In Marathi (Photo Credits: File Image)
Babasaheb Ambedkar Quotes In Marathi (Photo Credits: File Image)
B. R. Ambedkar Quotes| File Photo

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हिंदू धर्मातून बौद्ध धर्मांमध्ये धर्मांतर करण्यामागे असणार्‍या कारणांपैकी त्यांच्यामते अस्पृश्यांना हिंदू धर्मामध्ये योग्य वागणूक मिळत नाही. हिंदू धर्म जातिव्यवस्थेचा पुरस्कर्ता आहे तो माणसांत भेद निर्माण करतो,तसेच समता, स्वातंत्र्य आणि बंधुता यांचा अभाव आहे. त्यामुळे अशा धर्मव्यस्थेचा, समाजव्यवस्थेचा भाग राहण्यापेक्षा त्यांनी त्याचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. पुढे बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबर 1935 साली नाशिक मधील येवला येथे हिंदू धर्माचा त्याग करण्याची घोषणा केली. त्यानंतर विविध धर्मांचे अध्ययन करून अखेर 1956 साली विजयादशमीच्या मुहूर्तावर, 14 ऑक्टोबरला लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्म स्वीकारला.