Dhamma Chakra Pravartan Din 2020 Messages: धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मराठी शुभेच्छा, WhatsApp Status, SMS, Wishes, GIFs, Images च्या माध्यमातून देऊन साजरा करा आजचा दिवस
Dhammachakra Pravartan Din Messages (Photo Credits-File Images)

64th Dhammachakra Pravartan Din Messages 2020: भारतातील बौद्ध धर्मियांचा 'धम्मचक्र प्रवर्तन दिन' हा सर्वात महत्वाचा दिवस आहे. या दिवस बौद्ध समाजातील लोक एखाद्या सणाप्रमाणे साजरा करताना दिसून येतात. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956 रोजी 14 ऑक्टोंबर या दिवशी नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत तब्बल 5 लाख अनुयायी होते. याच कारणास्तव 14 ऑक्टोंबर हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो. आणखी एक महत्वाचे म्हणजे या दिवशी अशोक दशमी म्हणजेच दसऱ्याच्या मुहुर्तावर हा दिवस साजरा होतो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जेथे बौद्ध धर्मचाी दीक्षा घेतली त्याला दीक्षाभूमी म्हणून ओळखली जाते. आंबेडकरांनी ही दीक्षा घेण्यामागचे कारण म्हणजे या दिवशी इसवी पूर्व 3 ऱ्या शतकात सम्रोट अशोक सम्राट याने सुद्धा बौद्ध धर्मचा स्विकार केला होता. तर यंदाच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मराठी शुभेच्छा ग्रिटिंग्स, SMS, Wishes, GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन साजरा करा आजचा दिवस.(Dhammachakra Pravartan Day 2020 Date: धम्मचक्र प्रवर्तन दिन 14 ऑक्टोबर दिवशी साजरा करण्यामागील महत्त्व, इतिहास काय?)

>>आजही येतो गंध भिमाच्या दिक्षाभूमीच्या मातीला,

या मातीने उद्धारिले साऱ्या मानव जातीला

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या  हार्दिक शुभेच्छा!

Dhammachakra Pravartan Din Messages (Photo Credits-File Images)

>>मानवतेचा शिल्पकार या जगामंध्ये ठरला,

भिमानी कोटी कोटी काळजात बुद्ध कोरला

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Dhammachakra Pravartan Din Messages (Photo Credits-File Images)

>>तथागताच्या मधूर वाणी

धम्म शिक्षेची किती स्तुती

शरण ले सम्राट अशोक

भीमरावजी आंबेडकर

स्विकारला विश्व शांतीचा पथ

भीमरायाने ओढीला धम्माचा रथ

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Dhammachakra Pravartan Din Messages (Photo Credits-File Images)

>>बुद्धं शरणं गच्छामि

धम्मं शरणं गच्छामि

संघं शरणं गच्छामि

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

Dhammachakra Pravartan Din Messages (Photo Credits-File Images)

>>काळोखाच्या अंधारात लखलखतो हा सूर्य

परिवर्तनाच्या वाटेने झगमगते हे कार्य

दिक्षाभूमीत्या पायथ्याशी जगण्याचे हे धैर्य

चला एकमुखाने गाऊ भिमाचे शौर्य

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सदिच्छा!

Dhammachakra Pravartan Din Messages (Photo Credits-File Images)

तर सध्या देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरस थैमान घालत असून आतापर्यंत आलेले सर्व सण अत्यंत साधेपणाने आणि घरच्या घरी साजरे करण्यात आले आहे. त्यामुळे यंदाचा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सुद्धा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसणार नाही आहे. मात्र तुम्ही चिंता करु नका कारण धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त वरील काही मराठमोठे मेसेज पाठवून बौद्ध बांधवांसह आपण सर्वांनी हा दिवस साजरा करुयात.