Dhammachakra Pravartan Day 2020 Date: धम्मचक्र प्रवर्तन दिन 14 ऑक्टोबर दिवशी साजरा करण्यामागील महत्त्व, इतिहास काय?
Dhammachakra Pravartan Din Messages (Photo Credits: File Image)

64th Dhamma Chakra Pravartan Din:  बौद्ध बांधवांसाठी खास असलेल्या सणांपैकी एक म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिन (Dhammachakra Pravartan Day) . हा दिवस धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन (DhammaChakra Anupravartan Din) म्हणून देखील ओळखला जातो. दरवर्षी तारखेनुसार हा सण 14 ऑक्टोबर दिवशी साजरा केला जातो. या दिवशी बौद्ध बांधव नागपूर येथील दीक्षाभूमीवर एकत्र जमतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. B. R. Ambedkar) यांच्या स्मृतीला वंदन करतात. लक्षावधी बौद्ध धर्मीयांसाठी ही 14 ऑक्टोबर तारीख इतकी का महत्त्वाची आहे? हे तुम्हांला जाणून घ्यायचे असल्यास हा लेख नक्की वाचा आणि जाणून घ्या बौद्ध धर्मियांच्या या धम्मचक्र प्रवर्तन दिन या सणाबद्दल अधिक माहिती. Dhamma Chakra Pravartan Din 2020 Messages: धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मराठी शुभेच्छा, WhatsApp Status, SMS, Wishes, GIFs, Images च्या माध्यमातून देऊन साजरा करा आजचा दिवस.

बौद्ध धर्मीय 14 ऑक्टोबर हा दिवस खास आहे कारण हा दिवस अनेकांसाठी बौद्ध धर्मांतरण सोहळाची आठवण करून देणारा आहे. अशोक विजयादशमीला म्हणजेच 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूर येथील दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या काही सोबती, अनुयायींसोबत नवयान बौद्ध धर्म स्वीकारला होता. बौद्ध धर्मियांच्या मान्यतांनुसार, भारतामध्ये लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचं चक्र बाबासाहेबांनी गतिमान करत 'धम्मचक्र प्रवर्तन' केले म्हणून हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून ओळखला जातो. October 2020 Festival Calendar: ऑक्टोबर महिन्यात गांधी जयंती, नवरात्र, दसरा यांसारख्या सण-उत्सवांची रेलचेल; पहा या महिन्यातील सणांची संपूर्ण यादी

सम्राट अशोका यांनी इसवी सन पूर्व तिसर्‍या शतकामध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. हा दिवस अशोक विजयादशमी म्हणून ओळखला जातो. याच दिवसाचं औचित्य साधत 1956 साली विजयादशमीच्या मुहूर्तावर 14 ऑक्टोबर तारखेला नागपूर मध्ये दीक्षाभूमीवर सुमारे 5 लाख अनुयायींसोबत डॉ. आंबेडकरांनी देखील बौद्ध धर्म स्वीकारला आणि पुढे नागपूरची धम्मभूमी दीक्षाभूमी म्हणून ओळखली जाऊ लागली.

यंदा कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यावर निर्बंध असतील मात्र दरवर्षी लाखो भीम अनुयायींचा जनसमुदाय एकत्र जमतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला वंदन करतो. एकमेकांची भेट घेऊन त्यांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देतो.