Prisoners Released (Photo credit: File Photo)

केंद्र सरकारने (Central Governmemt) महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने (150th Birth Anniversary Of Mahatma Gandhi) कैद्यांना मुक्त (Prisoners Released) करण्याची योजना आखली होती. या योजनेअंतर्गत 3 टप्प्यात कैद्यांची सुटका केली जाईल, अशी घोषणा करण्यात आली होती. विशिष्ट प्रकारच्या कैद्यांना विशेष माफी मिळावी, यासाठी केंद्र सरकारने हे महत्वाचे पाऊल उचलले आहे. या योजनेतील पहिला आणि दुसरा टप्पा पार पडला असून आतापर्यंत 900 हून अधिक कैद्यांना सोडण्यात आले आहे. तिसरा आणि शेवटचा टप्पा 2 ऑक्टोंबर 2019 रोजी पूर्ण केला जाणार आहे. या दिवशी पात्र कैद्यांना तरुंगातून सोडण्यात येणार आहे. गेल्या वर्षी 2 ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने हा उपक्रम सुरु केला होता. 18 जुलै 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रीमंडाळाने कैद्यांच्या विशिष्ट प्रवर्गास विशेष सवलती देण्याचा निर्णय घेतला होता.

पहिल्या टप्प्यात 900 हून अधिक कैद्यांची सुटका करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातही काही कैदींची मुक्तता करण्यात आली होती. यानुसार 2 ऑक्टोंबर 2019 रोजी या योजनेचा तिसरा आणि शेवटचा टप्पा पूर्ण केला जाणार आहे. यावेळी पात्र कैदींना तरुंगातून सोडण्यात येणार आहे. राज्यांना व केंद्रशासित प्रदेशांना कैद्यांच्या मुक्तते अगोदर महात्मा गांधींच्या शिकवणुकीवर आधारित सर्व तुरूंगांच्या आवारात विशेष कार्यक्रम राबण्यात आले आहेत. याआधी कैद्यांकडून सुटकेवेळी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर, कैद्यांनी तरुंगातून बाहेर पडल्यानंतर योग्य मार्गाची निवड करावी, यासाठी महात्मा गांधी यांच्याशी संबधित पुस्तक भेट म्हणून देण्यात आली आहे. हे देखील वाचा-Bhagat Singh Birth Anniversary: भारत मातेचा वीरपुत्र भगत सिंग यांच्याबाबत जाणून घ्या न ऐकलेल्या काही गोष्टी

ANI चे ट्विट-

पात्र कैदी:

1) 55 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या महिला दोषी, ज्यांनी त्यांच्या वास्तविक शिक्षेच्या कालावधीत 50 टक्के शिक्षा पूर्ण केली आहे.

2) 55 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे तृतीय पंथी दोषी, ज्यांनी त्यांच्या वास्तविक शिक्षेच्या कालावधीत 50 टक्के शिक्षा पूर्ण केली आहे.

3) 60 वर्षांचे किंवा त्याहून अधिक वयाचे पुरुष दोषी, ज्यांनी त्यांच्या वास्तविक शिक्षेच्या कालावधीत 50 टक्के शिक्षा पूर्ण केली आहे.

4) 70 टक्के अपंगत्व असणार्‍या किंवा त्यांच्या वास्तविक शिक्षेचा कालावधीत 50 टक्के पूर्ण केलेल्या शारीरिक अपंग किंवा अपंग दोषींची सुटका

5) शिक्षा झालेल्या कैदी ज्यांनी त्यांच्या वास्तविक शिक्षेच्या कालावधीत दोन-तृतियांश किंवा 66 टक्के तरुंगवास भोगला आहेत.

अपात्र कैदी:

ज्या कैद्यांना मृत्युदंडाची शिक्षा आजीवन कारावास ठोठावली गेली आहे अशा गुन्ह्यासाठी दोषी ठरलेल्या कैद्यांना ही विशेष माफी योजना उपलब्ध नाही. हुंडा, हत्या, बलात्कार, मानवी तस्करी आणि पोटा, युएपीए, टाडा, एफआयसीएन, पॉक्सो अॅक्ट, मनी लॉन्ड्रिंग, फेमा, एनडीपीएस आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दोषी अशा गंभीर आणि जघन्य गुन्ह्यांत दोषींना अपात्र ठरवण्यात आले आहे.