क्रांतिकारी भगत सिंग (File Photo)

Bhagat Singh 112th Birth Anniversary: भारताचा वीरपुत्र भगत सिंग (Bhagat Singh) यांचा 28 सप्टेंबर म्हणजेच आज जन्मदिवस आहे. भारताची इंग्रजांच्या कैदेतून मुक्तता करण्यासाठी अवघ्या लहानपणासून त्यांनी लढा देण्यास सुरुवात केली. भगत सिंग यांनी भारतासाठी दिलेले बलिदान आजवर ऐकले तरीही अंगावर काटा उभा राहतो. इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताला बाहेर काढण्यासाठी लढा देत असलेल्या भगत सिंग यांना अवघ्या 23 व्या वर्षात फाशीची शिक्षा सुनावली. आज जरी भगत सिंग आपल्यात नाहीत तरीही त्यांचे विचार आणि त्यांच्या वीरमरणाची कथा आजही भारतीयांच्या मनात कायम आहे. तर भगत सिंग यांच्या जन्मदिवसानिमित्त जाणून घ्या त्यांच्याबाबत कधी न ऐकलेल्या काही गोष्टी.

भगत सिंग यांचा जन्म ब्रिटिश भारतातील पंजाब प्रांतातील लायपुर जिल्ह्यातील बंगा येथे 28 सप्टेंबर 1907 मध्ये झाला. जो आता पाकिस्तानचा एक भाग आहे. इंग्रजांच्या गुलागिरीतून भारताला बाहेर काढण्याची निष्ठा त्यांना वयाच्या 12 व्या वर्षात केली होती. भगत सिंग जेव्हा लहान होते त्यावेळी एकदा त्यांना एक बंदूक मिळाली होती. ती घेऊन भगत सिंग शेतात गेले आणि त्यांनी ती जमिनीखाली पुरली. जेणेकरुन मिळालेली बंदूक पुरल्यानंतर आंब्याच्या झाडासारख्या अनेक बंदुकी जमिनीखालून निघतील असे त्यांना वाटले होते. भगत सिंग यांनी नॅशनल कॉलेज, लाहौर येथे अभ्याक्रमादरम्यान विधानसभेत बॉम्ब फेकण्याची योजना आखली होती.

इंग्रजांच्या विरोधात लढा देण्यासाठी भगत सिंग यांनी त्यांच्यासोबत सुखदेव यांनासुद्धा सोबतीला घेतले होते. भगत सिंग यांनी त्यांच्या साथीदारांसोबत मिळून विधानसभेत बॉम्ब स्फोट घडवून आणला. या घटनेनंतर भगत सिंग यांच्याविरोधात कारावाई करत कोर्टात खटला दाखल झाला.त्याचसोबत भगत सिंग यांना आणि राजगुरु-सुखदेव यांना इंग्रजांच्या विरोधात षड्यंत्र आणि ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन पी सांडर्स यांच्या हत्येच्या आरोपाखाली 23 मार्च 1931 मध्ये लाहौर येथे फाशी सुनावण्यात आली.

राजगुरु यांच्यासोबत मिळून भगत सिंग यांनी 17 डिसेंबर 1928 मध्ये लाहौर येथील सहाय्यक पोलीस अधिक्षक जे.पी. सांडर्स यांची हत्या केली. या हत्येप्रकरणी भगत सिंग यांना राजगुरु यांनी पाठिंबा दिला होता. त्याचसोबत क्रांतिकारी चंद्नशेखर आझाद यांचा सुद्धा या प्रकरणी सहभाग होता. एवढेच नाही तर भगत सिंग यांनी क्रांतिकारी बटुकेश्वर दत्त यांच्यासोबत मिळून मध्य विधानसभेत 8 एप्रिल 1929 मध्ये इंग्रज सरकारला जाग येण्यासाठी बॉम्ब स्फोट घडवून आणले होते. त्यानंतर सुद्धा भगत सिंग यांना अटक करण्यात आली होती.('जालियनवाला बाग हत्याकांडाबद्दल आम्हाला लाज वाटले'; इंग्लंडच्या धर्मगुरूचे स्मारकासमोर क्षमा मागत लोटांगण)

जवळजवळ 2 वर्ष तुरुंगात घालवल्यानंतर भगत सिंग यांनी क्रांतिकारी विचारासंबंधित लेखन आणि अभ्यास करण्यास सुरुवात केली. असे सांगितले जाते की, भगत सिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना फाशी देण्यासाठी 24 मार्चच्या सकाळचा वेळ निश्चित करण्यात आला होचा. मात्र 23 मार्चला या तिघांनी आपले आयुष्य संपवले होते. तर या तिघांना फाशी देण्यात येणार असल्याची गोष्ट संपूर्ण भारतात एका आगीप्रमाणे परसली असल्याने त्यांनी ही गोष्ट केली होती.