![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/06/RBI-784x441-380x214.jpg)
देशात सध्या वस्तूंच्या किंमती वाढत असल्याने महागाईचा फटका सर्वांनाच बसला आहे. मात्र तरीही आरबीआयकडून (RBI) या परिस्थितीत रेपो दरात कपात करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत एका अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे. ग्राहक किंमत महागाई निर्देशांक 4.62 टक्क्यांवर आला असल्याचे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले आहे. मात्र आता पुढील वर्षात पहिल्या तिमाहीत जीडीपी पाच टक्क्यांच्या खाली येणार असल्याचा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.
तसेच बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंच यांनी असे म्हटले आहे की, डिसेंबर महिन्यात आरबीआय 0.25 टक्क्यांनी कपात करण्याची शक्यता आहे. तसेच फेब्रुवारी महिन्यात 0.15 टक्क्यांनी दरकपात होणार आहे. परंतु आरबीआयने अजून दरकपात केल्यास आर्थिक अस्थिरता निर्माण होईल असा अंदाज एसबीआयच्या अर्थतज्ञांनी व्यक्त केला आहे.(यंदाची दिवाळी नागरिकांना पडली महाग; ऑक्टोबर महिन्यात महागाईचा निर्देशांक 4.62 टक्क्यांवर)
त्याचसोबत ऑक्टोबर महिन्यात भारतीय रिजर्व्ह बँक ने आपल्या रेपो रेट ने 1.4 टक्क्यांवरून 0.24 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. म्हणजेच 5.40 टक्क्यांवरून 5.14 टक्के इतका आला आहे. केंद्रीय बँकेच्या मॉनेटरी पॉलिसी समितीने रेपो रेट कमी करण्याचा निर्णय घेतला होता. तर केंद्रीय बँकेकडून असे सांगण्यात आले होते. रेपो रेट कमी ठेवल्याने आणखी घसरण होऊ शकते. शेअर बाजाराला रेपो रेटमध्ये घट झालेले रुचले नसले तरीही लोनवरील व्याज दर कमी झाल्यामुळे नागरिकांकडून या निर्णयाचे स्वागत केले होते.