प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Videoblocks)

सामान्यांना सोसावी लागणारी महागाईची झळ दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत असून याचे ज्वलंत उदाहरण पाहायला मिळाले ते ऑक्टोबर महिन्यात. अन्नधान्याच्या किमती वाढल्याने ऑक्टोबरमधील महागाईचा निर्देशांक 4.62 टक्क्यांवर गेला आहे. हा महागाईचा आतापर्यंतचा सर्वात मोठा उच्चांक असल्याचे सांगण्यात येत आहे. लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, मागील महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे भाज्या, अन्नधान्यांच्या किंमतीत दुपटीने वाढ झाला. त्याचा परिणाम म्हणून हे चित्र पाहायला मिळत आहे.

यंदा झालेला पाऊस हा राज्यात आतापर्यंतचा सर्वाधिक झालेला पाऊस होता आणि मुख्य म्हणजे या वर्षी अवकाळी पाऊस बराच काळ राहिला. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये राज्यात ब-याच ठिकाणी अवकाळी पावसाचा नाहक त्रास लोकांना सहन करावा लागला. याचा सर्वाधिक फटका बसला तो बळीराजाला. अवकाळी पावसामुळे त्यांच्या पिकांचे नुकसान झाले ज्याचे परिणाम स्वरुप अन्नधान्यांच्या किंमतीतही वाढ झाली. घरगुती गॅस च्या किंमतीत सलग तिस-या महिन्यात वाढ; गृहिणींचे बजेट कोलमडणार

गेल्या महिन्यात अन्नधान्याच्या महागाईचा दर 7.89 टक्क्य़ांवर पोहोचला आहे. वर्षभरापूर्वी तो 5.11 टक्के होता. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, यंदाच्या ऑक्टोबरमध्ये भाज्यांच्या किमती तब्बल 26.10 टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. तर फळांचे दर 4.08 टक्क्य़ांवर गेले आहेत. त्याचबरोबर डाळी, मटण, मासे यांच्या किमतीही वेगाने वाढल्या आहेत.

इंधन तसेच ऊर्जा गटात मात्र गेल्या महिन्यात दरांची घसरण झाली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेचे महागाई दराचे 4 टक्क्यांचे लक्ष्य आहे. यंदा त्या पलीकडे दर उंचावला आहे. मध्यवर्ती बँकेचे आगामी पतधोरण येत्याच महिन्यात आहे.