Ram Vilas Paswan | (Photo Credits: Facebook)

केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ति पार्टी (Lok Janshakti Party) संस्थापक रामविलास पासवान (Ram Vilas Paswan) यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) मोठा झटका बसला आहे. त्यासोबतच लोक जनशक्ति पक्ष आणि बिहारच्या राजकारणावरही (Politics of Bihar) मोठा परिणाम होणार आहे. राम विलास पासवान यांच्या निधनाकडे केवळ एका व्यक्तीचा मृत्यू असे बघून चालणार नाही. राम विलास पासवान ही राष्ट्रीय राजकारणातील एक स्वतंत्र शक्ती होती. सत्तासमिकरण, सामाजिक जाण, मुद्द्यांवरचे राजकारण, बहुजन चेहरा आणि त्यासाठी पणाला लावावी लागणारी राजकीय कारकीर्द अशा सर्व बाबतीत पासवान उठून दिसत. राकारणात निर्णय चुकतात. पासवान यांचेही ते अनेकदा चुकले. तरीही केंद्रामध्ये आपले स्वतंत्र अस्वित्व कायम ठेवण्यात ते नक्कीच यशस्वी झाले. पसवान यांनी एकदोन नव्हे तर सहा पंतप्रधानांसमवेत काम केले. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी त्यांना भारतीय राजकारणातील हवामान तज्ज्ञ (Weatherman of Indian Politics) अशी उपमा दिली. पासवान यांच्या राजकीय कारकिर्दीवर टाकलेला हा अल्पसा कटाक्ष.

जीवन परीचय

बिहारच्या राजकारणात रामविलास पासवान हे एक बहुजन चेहरा होते. बिहारच्या राजकारणात येण्यापूर्वी रामविलास पासवान हे प्रशासकीय सेवेत अधिकारी होते. बिहार येथील खगडिया जिल्ह्यातील अलौली येथील शाहरबन्नी गावात 5 जुलै 1946 मध्ये त्यांचा जन्म झाला. राजकुमारी देवी यांच्यासोबत त्यांनी 1960 मध्ये विवाह केला. त्यांचे वैवाहीक जीवन काहीसे धकाधकीचे राहिले. 1981 मध्ये त्यांनी पहिली पत्नी राजकुमारी देवी यांना घटस्फोट दिला. 1983 मध्ये त्यांनी रीना शर्मा यांच्याशी विवाह केला. त्यांना दोन्ही पत्नींपासून तीन मुली आणि एक मुलगा आहे. रामविलास यांनी कोसी कॉलेज खगडीया येथून आणि पाटना विद्यापीठातून शिक्षण घेतले. पाटना विद्यापीठातून त्यांनी एमए आणि कायद्याची पदवी घेतली. त्यांना मांसाहार पसंत होता. मासे हा त्यांचे आवडता आहार होता. (हेही वाचा, Ram Vilas Paswan Passes Away: केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन; पीएम नरेंद्र मोदी, राहुल गांधी, राजनाथ सिंह यांच्यासह 'या' नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली)

Vilas Paswan, Chirag Paswan and Pranab Mukherjee | (Photo Credits: Facebook)

सत्तरच्या दशकात राजकारणात सक्रीय

रामविलास पासवान यांनी आपली राजकीय कारकीर्द लालू प्रसाद यादव, नितीश कुमार यांच्यासोबतच केली. ते 1970 चे दशक होते. 1996 मध्ये ते पहिल्यांदा अलौली विधानसभा मतदारसंघातून निवडूण आले. त्यानंतर त्यांनी आपली राजकीय कारकीर्द जोमाने सुरु ठेवली. 1977 मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक जिंकली. पासवान हे सलग 9 वेळा खासदार राहिले. त्यांनी सन 2000 मध्ये आपला स्वतंत्र पक्ष काढला. लोक जनशक्ती असे या पक्षाचे नाव. .(Ram Vilas Paswan Dies: केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांचे निधन; काही काळापासून होते आजारी)

तब्बल 6 पंतप्रधानांसोबत कामाचा अनुभव

राम विलास पासवान यांनी वयाच्या 74 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांनी आपल्या एकून राजकीय कारकीर्दीत एकूण 6 पंतप्रधानांसोबत काम केले. यात विश्वनाथ प्रताप सिंह, एचडी देवेगौडा, इंद्र कुमार गुजराल, अटल बिहारी वाजपेयी, डॉ मनमोहन सिंह आणि आता नरेंद्र मोदी अशा ती श्रृंखला.

Vilas Paswan With George Fernandes | (Photo Credits: Facebook)

केंद्रात मंत्री परंतू, राज्यातील राजकारणात अकुंचन

रामविलास पासवान हे केंद्रात प्रदीर्घ काळ मंत्री जरुर राहिले. परंतू बिहारच्या राजकारणात त्यांचा व्यास अकुंचन पावत गेला. त्यांनी स्वतंत्र पक्ष काढला परंतू, तो अद्यापही बिहारच्या राजकारणात अथवा केंद्रीय राजकारणात किंगमेकर अथवा सत्तासमीप अद्यापही पोहोचला नाही. (हेही वचा, Ram Vilas Paswan Heart Surgery: केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांची प्रकृती बिघडली, रात्री उशीरा हृदय शस्त्रक्रिया; लोजपा अध्यक्ष चिराग पासवान यांची माहिती)

एनडीए, बिहारच्या राजकारणावर परिणाम

कंद्रात राष्ट्रीय पक्षाची स्वबळावर सत्ता येणे कठीण होऊन बसले. पुढे तशी शक्यताही धुसर दिसू लागल्याने राष्ट्रीय पक्षांनी प्रादेशीक आणि इतर पक्षांशी आघाडी करुन राजकारण करण्याचा निर्णय घेतला. त्यातून संयुक्त पुरोगामी आघाडी (संपुआ-UPA) आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ - NDA) अशा दोन राष्ट्रीय आघाड्या उदयास आल्या. रामविलास पासवान यांनी सुरुवत संयुक्त परोगामी आघाडीपासून केली आणि आपल्या उत्तरार्धात ते रोष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी झाले. बिहारच्या राजकारणातही त्यांच्या पक्षाने आता स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे.

Vilas Paswan | (Photo Credits: Facebook)

दरम्यान, शिवसेना, अकाली दल असे महत्त्वपूर्ण आणि संस्थापक सदस्य असलेले राजकीय पक्ष एनडीएची साथ सोडून गेले आहेत. अशा स्थितीत रामविलास पासवान यांचा लोक जनशक्ती पक्षही बिहार विधानसभा निवडणूक स्वबळावर लढत आहे. (बिहारमध्ये एनडीएतून बाहेर पडत) फक्त केंद्रामध्ये लोजपा एनडीएसोबत आहे. अशा काळात एनडीए टीकवायची तर लोजपासारखा पक्ष सोबत असणे महत्त्वाचे आहे. रामविलास हे केंद्रात मोदी सरकारमध्य मंत्री होते. ही सर्व पार्श्वभूमी पाहता एनडीएला पासवान यांच्या निधनाने मोठा झटकाच बसला आहे. दुसऱ्या बाजूला बिहारच्या राजकारणातही मोठ्या प्रमाणवर ओळख असलेला दलित चेहरा हरपला आहे. त्यामुळे बिहारच्या राजकारणावरी त्याचे मोठे आणि दीर्घकालीन परिणाम होणार आहेत.