रामविलास पासवान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी (Photo Credits-PTI)

Ram Vilas Paswan Passes Away: केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे दीर्घआजाराने निधन झाले आहे. त्यांचा मुलगा आणि खासदार चिराग पासवान यांनी निधन झाल्याचे ट्विट करत सांगितले. यापुर्वी फुफ्फुसात इन्फेक्शन आणि किडनी संदर्भातील आजारामुळे पासवान यांना राजधानी दिल्लीतील फोर्टिस एस्कॉर्ट रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रियंका गांधी वाड्रा, राजनाथ सिंह, राहुल गांधी, केंद्रीय मंत्री रवि शंकर यांच्यासह अन्य नेत्यांनी सुद्धा ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे.

रामविलास पासवान यांच्या निधनाच्या बातमीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करत असे म्हटले की, हे एक वैयक्तिक नुकसान, मी एका मित्राला आणि मौल्यवान साथीदाराला गमावले आहे.(Ram Vilas Paswan Dies: केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांचे निधन; काही काळापासून होते आजारी)

राहुल गांधी यांनी ट्विट करत रामविलास पासवान यांच्या निधनाने दु:ख व्यक्त केले आहे. गरीब-दित वर्गाने आपला एक बुलंद राजकिय आवाज गमावला. त्यांच्या परिवाराच्या दुखात मी सहभागी आहे.

प्रियंका गांधी वाड्रा यांनी असे म्हटले आहे की, रामविलास पासवान हे वर्षांपासून माझ्या आईचे शेजारी राहिले आहेत. त्यांच्या परिवारासोबत आमचे खासगी नाते होते. त्यांच्या निधनामुळे अत्यंत दु:ख झाले आहे. चिराग आणि परिवारासोबत मी आहे. या दु:खाच्या काळात आम्ही तुमच्या सोबत आहोत.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी असे म्हटले की, श्री रामविलास पासवान यांचे निधन हे अत्यंत पीडादायक आहे. आपल्या राजकीय आयुष्यात त्यांनी गरीब, दलित आणि वंचितांच्या कल्याणासाठी काम केले.

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ट्विट मध्ये असे म्हटले की, रामविलास पासवान हे भारतात सरकार मधील वरिष्ठ मंत्री होते. अटलजी यांच्या सरकारमध्ये पहिल्यांदाच त्यांना कोळश्याच्या खाणीचे राज्य मंत्री पद दिले गेले. त्यांचे निधन हे देशासाठी वैयक्तिक नुकसान आहे.

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे ट्वीट-

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे ट्वीट-

मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी असे लिहिले की, श्री रामविलास पासवान यांच्या निधनामुळे अत्यंत स्तब्ध झालो आहे. त्यांना मी श्रद्धांजली वाहतो. त्यांनी आपले आयुष्य बिहार मधील नागरिकांच्या कल्याणासाठी समर्पित केले. मध्यप्रदेशाच्या विकासात त्यांचे योगदान नेहमीच लक्षात ठेवले जाईल.