UP Minor Gangrape: अपहरणानंतर गावातील दोन मुलांनी अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार, कारवाई लवकर न झाल्यामुळे पिडीतेने केली आत्महत्या
उत्तर प्रदेशातील कन्नौजमध्ये पोलिसांच्या खराब कार्यशैलीमुळे 17 वर्षीय सामूहिक बलात्कार पीडितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. गावात पीडितेसोबत राहणाऱ्या दोन मुलांनी तिचे अपहरण करून तिला दिल्लीला नेले. जिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्यानंतर दोघांनीही तिला याबाबत कुणालाही न सांगण्याची धमकी देत तिला गावापासून काही अंतरावर सोडले. पीडिता घरी आल्यावर तिने तिच्या कुटुंबीयांना घडलेली घटना सांगितली.
UP Minor Gangrape: उत्तर प्रदेशातील कन्नौजमध्ये पोलिसांच्या खराब कार्यशैलीमुळे 17 वर्षीय सामूहिक बलात्कार पीडितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. गावात पीडितेसोबत राहणाऱ्या दोन मुलांनी तिचे अपहरण करून तिला दिल्लीला नेले. जिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्यानंतर दोघांनीही तिला याबाबत कुणालाही न सांगण्याची धमकी देत तिला गावापासून काही अंतरावर सोडले. पीडिता घरी आल्यावर तिने तिच्या कुटुंबीयांना घडलेली घटना सांगितली. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलीस ठाणे गाठून दोन्ही मुलांविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
गँगरेप पीडितेची आत्महत्या :
यूपी के कन्नौज में 17 वर्षीय नाबालिग गैंगरेप पीड़िता ने की आत्महत्या
यूपी के कन्नौज में 17 वर्षीय नाबालिग गैंगरेप पीड़िता ने की आत्महत्या
पीड़िता ने पुलिस की लचर कार्यशैली के चलते की आत्महत्या
नाबालिग लड़की का पड़ोसी गांव में रहने वाले दो युवकों ने अपहरण करने बाद गैंगरेप किया था और धमका कर घर पर छोड़ दिया था. पिता ने FIR दर्ज कराई, हुई. आरोपी… pic.twitter.com/fil12uUiqj
— Priya singh (@priyarajputlive) July 24, 2024
घटनेबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक काय म्हणाले जाणून घ्या:
या घटनेबाबत कन्नौज जिल्ह्याचे एसपी अमित कुमार आनंद यांनी सांगितले की, ही बाब ११ जुलैची आहे. सौरीख पोलिस स्टेशन परिसरात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी दाखल केली होती. 14 जुलै रोजी मुलगी सापडली. या प्रकरणी 18 जुलै रोजी न्यायालयात मुलीचा जबाब नोंदवला होता. मात्र 23 जुलै रोजी मुलीने आत्महत्या केली. या प्रकरणातील फरार असलेल्या दोन आरोपींपैकी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. सध्या दुसऱ्याचा शोध सुरू आहे. ज्यांना लवकरच अटक करण्यात येईल.
(The above story first appeared on LatestLY on Jul 24, 2024 04:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

