Two died after drowning in Dudhganga river : पावसाळी पर्यटन जीवावर बेतले; कोल्हापुरातील दूधगंगा नदीत बुडून दोघांचा मृत्यू
Drowning प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

Two died after drowning in Dudhganga river: रविवारी लोणावळ्यातील भुशी डॅम ऑव्हर फ्लो झाल्याने (Bhushi Dam) च्या धबधब्याच्या आनंद घेण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबासोब मोठी दुर्घटना घडली. या घटनेत 5 जण वाहून गेले. ही घटना ताजी असतानाच काल दुपारच्या सुमारास ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) एक तरुण वाहून गेल्याची बातमी समोर आली. आता त्यानंतर कोल्हापुरातून दुर्दैवी घटना समोर आली आहे. पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या दोघांचा दूधगंगा नदीत बुडून मृ्त्यू झाला आहे. काळमवाडी येथे ही घटना घडली. दोन्ही तरुण निपाणी येथील रहिवासी होते. दोघांच्या मृत्यूनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा:Heavy Rain In Satara: साताऱ्यात पावसाचा जोर वाढला, कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ )

ताम्हणी घटनेत तरुण आपल्या जिममधील 32 जणांच्या ग्रुपसोबत फिरण्यासाठी गेला होता. स्वप्नील धावडे असं या तरुणाचं नाव आहे. स्वप्नील धावडेने पाण्यात उडी मारल्यानंतर तो जोरदार प्रवाहात बेपत्ता वाहून गेला. हा ग्रुप शनिवारी वीकेंडला सहलीसाठी मुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅली येथे गेला होता.

गणेश चंद्रकांत कदम आणि प्रतीक पाटील अशी मृत तरुणांची नावे आहेत. पावसाळी पर्यटनासाठी 13 जण निपाणी होऊन काळमवाडी परिसरात आले होते. या 13 जणांपैकी 2 तरुणांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे.