कोरोना व्हायरसने (Coronavirus) संपूर्ण जगात थैमान घातला आहे. आतापर्यंत कोरोना व्हायरसची लागण होऊन 7 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यातच कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज 19 मार्च रोजी रात्री 8 वाजता देशातील नागरिकांना संबोधित करणार आहेत. देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नुकतीच नरेंद्र मोदी यांनी एक महत्त्वपूर्ण बैठक घेतल्याचे समोर आले होते. त्यानुसार ते आज संपूर्ण देशाला संबोधित करणार असल्याची माहिती एएनआय वृत्त संस्थेने दिली आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटमार्फतही याबाबत माहिती देण्यात आली आहे. नरेंद्र मोदी देशातील नागरिकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणती काळजी घ्यावी? त्याचा सामना करण्यासाठी काही सूचना देण्याची शक्यता आहे. यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष आता नरेंद्र मोदी यांच्या घोषणाकडे लागले आहे.

कोरोना व्हायरसने संपूर्ण जग हादरुन गेले आहे. जगातील बर्‍याच देशांमध्ये साथीच्या रोगासारखी स्थिती आहे. यापासून बचाव करण्यासाठी सरकारने अनेक महत्वाची पावले उचलताना दिसत आहे. कोरोना व्हायरसचा प्रदुर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे. सध्या  देशात कोरोना बाधित रुग्णाची संख्या 147 जाऊन पोहचली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान यांनी ट्वीटच्या माध्यमातून भारतातील जनतेला संबोधित करणार असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी कोरोनाबाबत कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला असून याबाबत नरेंद्र मोदी यांनी महत्वपूर्ण बैठक घेतली आहे. हे देखील वाचा- Coronavirus: जगभरात कोरोना व्हायरसचा कहर; इटली येथे एका दिवसात तब्बल 475 लोकांचा मृत्यू

एएनआयचे ट्वीट-

आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. ज्या नागरिकांना होम क्वॉरंटाईन सांगितले आहे त्यांनी स्वत:हूनच घरी राहून स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घ्यावी. परिसरात किंवा इतरत्र फिरू नये. अशा व्यक्तींवर शासनाचे लक्ष असून होम क्वॉरंटाईनचा शिक्का असलेली व्यक्ती जर बाहेर फिरताना आढळली तर, तिला सक्तीने रुग्णालयात भरती करण्यात येईल, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. जनतेने जीवनावश्यक वस्तूंचा, अन्नधान्य, औषधी यांचा साठा करू नये. राज्यातील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा पुरेशा प्रमाणात व सुरळीत असल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन जर कोणी व्यापारी साठेबाजी करीत असेल किंवा औषधांच्या, मास्कच्या किंमती अव्वाच्या सव्वा लावत असेल तर त्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशीही माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याअगोदर 8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री 8 वाजताच संपूर्ण देशाला संबोधित केले होते. त्यावेळी त्यांनी नोटबंदीसारखी मोठी घोषणा केली होती. त्या घोषणेनुसार देशातील तत्कालीन 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्या होत्या आणि नव्या नोटा देशाच्या चलनात आल्या होत्या.