Solar Eclipse 2020: आज (21 जून) वर्षातील पहिलेच सुर्यग्रहण दिसून येणार आहे. देशामधील काही भागात हे सुर्यग्रहण कंकणाकृती तर काही ठिकाणी खंडग्रास स्वरुपात दिसणार आहे. ग्रहण ही एक नैसर्गिक व खगोलीय घटना आहे. जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वी एका कक्षेत येतात आणि चंद्राची सावली सूर्यावर पडते तेव्हा ग्रहण दिसून येते. साहजिकच कधी तरी जुळून येणारा हा योग असल्याने खगोलप्रेमींसाठी आजचा दिवस महत्वाचा ठरणार आहे. तर भारतात विविध ठिकाणी ग्रहणाला सुरुवात झाली आहे. याच दरम्यान आता दिल्ली, जम्मू कश्मीर मधील ग्रहणाचे फोटो समोर आले आहेत.
जम्मू-कश्मीर येथे सकाळी 9.15 मिनिटांनी ग्रहणाला सुरुवात झाली असून दुपारी 3.04 वाजेपर्यंत राहणार आहे. दुपारी 12.10 मिनिटांनी ग्रहणामुळे सुर्याचा अधिक भाग व्यापला जाणार असून ते थोडे तीव्र होणार आहे. हे सुर्यग्रहण एशिया, आफ्रिका, युरोप आणि ऑस्ट्रेलियातील काही भागांसह प्रशांत, हिंद महासागर येथे सुद्धा दिसणार आहे.(Surya Grahan 2020 Free Live Streaming Online: मुंबई, पुणे सह भारत भरातील सूर्यग्रहणाचं इथे पहा थेट प्रक्षेपण)
Jammu & Kashmir: Jammu witnesses #SolarEclipse2020
The solar eclipse will start at 9:15 AM and will be visible until 3:04 PM. The maximum eclipse will take place at 12:10 IST. It will be visible from Asia, Africa, the Pacific, the Indian Ocean, parts of Europe and Australia. pic.twitter.com/5tvnfr7O7G
— ANI (@ANI) June 21, 2020
दिल्लीत सुद्धा सुर्यग्रहणाला सुरुवात झाली असून त्याचे फोटो समोर आले आहेत. दिल्लीत ग्रहण दुपारी 3.04 वाजेपर्यंत राहणार आहे. तर दुपारी 12.10 वाजता ग्रहणामुळे सुर्याचा अधिक भाग व्यापला जाणार आहे.(Surya Grahan June 2020: भारतामध्ये 21 जून दिवशी नेमक्या कोणत्या शहरातून दिसणार 'कंकणाकृती सूर्यग्रहण' ?)
Delhi: #SolarEclipse2020 as seen in the skies of the national capital today.
The solar eclipse will be visible until 3:04 PM. The maximum eclipse will take place at 12:10 IST. It will be visible from Asia, Africa, the Pacific, the Indian Ocean, parts of Europe and Australia. pic.twitter.com/tJNM01YwGx
— ANI (@ANI) June 21, 2020
गुजरात येथे सुर्यग्रहण दुपारी 1.32 पर्यंत राहणार आहे. तसेच 11.42 मिनिटांनी ग्रहणामुळे सुर्याचा बहुतांश भाग व्यापला जाणार आहे.
Gujarat: #SolarEclipse2020 seen in the skies of Gandhinagar.
The solar eclipse will be visible until 1:32 PM with maximum visibility of the eclipse at 11:42 IST. It will be visible from Asia, Africa, the Pacific, the Indian Ocean, parts of Europe and Australia. pic.twitter.com/Lp0xs53JoF
— ANI (@ANI) June 21, 2020
राजस्थान येथे सुर्यग्रहण दुपारी 1.44 मिनिटांपर्यंत राहणार आहे. तसेच 11.55 मिनिटांनी ग्रहणामुळे सुर्याचा बहुतांश भाग झाकला जाणार आहे.
Rajasthan: #SolarEclipse2020 seen in the skies of Jaipur.
The solar eclipse will be visible until 1:44 PM with maximum visibility of the eclipse at 11:55 IST. It will be visible from Asia, Africa, the Pacific, the Indian Ocean, parts of Europe and Australia. pic.twitter.com/MnnFvua1St
— ANI (@ANI) June 21, 2020
हरियाणा मधील सुर्यग्रहणाचे फोटो येथे पहा
Haryana: #SolarEclipse2020 as seen in the skies of Kurukshetra. pic.twitter.com/LCpg8ltvJk
— ANI (@ANI) June 21, 2020
तर सूर्य ग्रहणात वेध काळ, सुतक काळ हा ग्रहणाच्या 12 तास आधी सुरू होतो. त्यामुळे आजच्या कंकणाकृती सूर्यग्रहणाचा सुतक काळ आज (20 जून) रात्री पासूनच सुरू झाला आहे. ऑनलाईन सूर्यग्रहण पाहण्याचे मुख्य कारण असे की, सूर्यग्रहण थेट पाहिल्याने डोळ्यांना हानी पोहचू शकते, तसेच सध्या लॉक डाऊन सुरु असल्याने बाहेर पडून सूर्यग्रहण करताना कोरोनाचा धोका उद्भवू नये हे सुद्धा पाहणे आवश्यक आहे.