Surya Grahan 2020 Free Live Streaming Online: मुंबई, पुणे सह भारत भरातील सूर्यग्रहणाचं इथे पहा थेट प्रक्षेपण
Solar eclipse live streaming (Photo Credits: File Image)

Solar Eclipse 2020 Free Live Streaming Online:  ग्रहण ही एक अदभूत नैसगिक आणि खगोलीय घटना आहे. आज भारतामध्ये कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. मात्र कंकणाकृती सूर्यग्रहण हे प्रामुख्याने उत्तर भारतातील काही विशिष्ट भागांमध्ये दिसणार आहे. तर महाराष्ट्रात खंडग्रास सूर्यग्रहण आहे. मग तुम्ही देखील खगोलप्रेमी असाल आणि हे महाराष्ट्रात राहून तुम्हांला सूर्यग्रहणाची कंकणाकृती पहायची असेल तर तुमच्यासाठी काही ऑनलाईन पर्याय खुले आहेत. यामध्ये तुम्हांला घरबसल्या आणि अगदीच सुरक्षित पद्धतीने कंकणाकृती सूर्यग्रहणाची स्थिती पाहता येणार आहे. Surya Grahan June 2020 Timing: कंकणाकृती सूर्यग्रहण 21 जून दिवशी; जाणून घ्या मुंबई, पुणे, नागपूर्, नाशिक सह भारताच्या विविध शहरात नेमकी किती वाजता पाहता येणार ही खगोलीय घटना!

सूर्य ग्रहण अमावस्येच्या दिवशी दिसते, जेव्हा चंद्र, पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो आणि तिघेही एका सरळ रेषेत असतात. जेव्हा चंद्र पृथ्वीपासून त्याच्या सर्वाधिक लांब अंतरावर राहून सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येऊन सूर्याला झाकतो, मात्र लहान आकारामुळे तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही, तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण दिसते. अशा वेळी चंद्र सूर्याच्या मध्यभागी दिसतो आणि सूर्याच्या बाह्याकाराचे कंकण दिसू लागते.

कंकणाकृती सूर्यग्रहण घरबसल्या पाहण्यासाठी

आज सूर्यग्रहण 10 वाजून 19 मिनिटांनी कंकणाकृती ग्रहणाला सुरुवात होईल. कंकणाकृती ग्रहण दुपारी 2 वाजून 2 मिनिटांनी सुटेल तर खंडग्रास ग्रहण दुपारी 3 वाजून 4 मिनिटांनी सुटेल. कंकणाकृती ग्रहण सुरू असताना भारतात सूर्याचा 98.6 % भाग चंद्रामुळे झाकला जाईल.