Surya Grahan June 2020: भारतामध्ये 21 जून दिवशी नेमक्या कोणत्या शहरातून दिसणार 'कंकणाकृती सूर्यग्रहण' ?
Representational Image (Photo Credits: unsplash.com)

भारतामध्ये सन 2020 मधील शेवटचं सूर्यग्रहण राविवार, 21 जून दिवशी दिसणार आहे. हे काही भागात कंकणाकृती सूर्यग्रहण तर काही ठिकाणी खंडग्रास सूर्यग्रहण अशा स्वरूपात दिसेल. अनेक खगोलप्रेमींना उद्या अवकाशामध्ये सूर्याभोवतीचं कंकण बघण्याची उत्सुकता आहे. मग हा अनोखा नजराणा उद्या भरतामध्ये नेमक्या कोणकोणत्या शहरातून दिसणार आहे त्याची माहिती The Ministry of Science and Technology कडून देण्यात आली आहे. प्रामुख्याने उत्तर भारतातील शहरात हे सूर्यग्रहण कंकणाकृती दिसेल. त्यामुळे ग्रहणाबाबतचे समाजातील अनेक समज गैर समज दूर सारून उद्या पुरेशी काळजी घेत सूर्य ग्रहण पाहण्याचा आनंद घ्या असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. Surya Grahan 2020 Pregnancy Precautions: गरोदर महिलांनी सूर्यग्रहणाच्या काळात कोणती काळजी घ्यावी?

उत्तर भारतामध्ये अनुपगड, सुरतगड, सिरसा, झाकल, कुरूक्षेत्र. यमुनानगर, देहरादून, तपोवन, जोशीमठ या भागातून सूर्यग्रहण कंकणाकृती दिसेल. तर महाराष्ट्रामध्ये सूर्यग्रहण खंडाग्रास रूपात दिसणार आहे. परंतू हे सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी बघू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. (सूर्यग्रहणाच्या भारतातील इतर शहरातील नेमक्या वेळा पाहण्यासाठी इथे क्लिक करा).

सूर्य ग्रहण अमावस्येच्या दिवशी दिसते, जेव्हा चंद्र, पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो आणि तिघेही एका सरळ रेषेत असतात. जेव्हा चंद्र पृथ्वीपासून त्याच्या सर्वाधिक लांब अंतरावर राहून सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येऊन सूर्याला झाकतो, मात्र लहान आकारामुळे तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही, तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण दिसते. अशा वेळी चंद्र सूर्याच्या मध्यभागी दिसतो आणि सूर्याच्या बाह्याकाराचे कंकण दिसू लागते.