Solar Eclipse June 2020: भारतामध्ये यंदा 21 जून दिवशी काही ठिकाणी कंकणाकृती तर काही ठिकाणी खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. सूर्यग्रहणाची 'कंकणाकृती' प्रामुख्याने उत्तर भारतातील काही शहरांमध्ये पाहता येणार आहे. तर उर्वरित ठिकाणी हे खंडग्रास सूर्यग्रहण असेल. ग्रहण ही सामान्य खगोलीय घटना असली तरीही त्याबाबत भारतीय समाजात अनेक समज गैरसमज आहेत. प्रामुख्याने गरोदर महिलांना ग्रहणाच्या काळात अधिक सांभाळलं जातं. त्यांची विशेष काळजी घेतली जाते. ग्रहणाचा बाळाच्या वाढीवर काही घातक परिणाम होतो याला कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा नाही. गरोदर महिला ग्रहणात बाहेर पडली तर तिच्या बाळामध्ये दोष निर्माण होतात ही केवळ समजुत आहे. त्यामुळे त्यावर विश्वास ठेवावा की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. अजुनही ग्रहणामुळे गर्भावर विपरित परिणाम झाल्याची घटना कुठे नोंद नाही. Surya Grahan June 2020 Timing: कंकणाकृती सूर्यग्रहण 21 जून दिवशी; जाणून घ्या मुंबई, पुणे, नागपूर्, नाशिक सह भारताच्या विविध शहरात नेमकी किती वाजता पाहता येणार ही खगोलीय घटना!
21 जून दिवशी सकाळी सूर्यग्रहण 9.15 वाजता सूरू होणार आहे. या ग्र्हणाच्या काळात गरोदर महिला, नवजात बालकं आणि नवमातांची विशेष काळजी घेतली जाते. एकूणच अनेक लोकं ग्रहणाचा काळ हा अशुभ मानतात. त्यावेळेत शुभ कार्य टाळली जातात. Surya Grahan June 2020 Sutak Time: 21 जूनच्या सूर्य ग्रहणाचा सुतक काळ काय? या वेळेत काय कराल काय टाळाल?
सूर्य ग्रहण खरंच लहान मुलांसाठी, गर्भासाठी नुकसानकारक असतं?
सूर्यग्रहण ही अवकाशात घडणारी एक नैसर्गिक स्थिती आहे. त्याचा बाळावर परिणाम होण्याची थेट शक्यता नसते. मात्र काहींच्या मते त्यामुळे गर्भात दोष निर्माण होतात. पण हा केवळ मान्यातांचा भाग आहे.
गरोदर महिलांनी घरीच रहावं का?
ग्रहणाच्या काळात महिलांनी घरीच रहावं. या काळात नामस्मरण करावं. बाहेर पडल्यास किंवा कामं केल्यास बाळात दोष निर्माण होतात अशी धारणा आहे. मात्र त्याला वैज्ञानिक पुरावा नाही.
गरोदर महिलांनी ग्रहण बघू नये?
ग्रहण थेट डोळ्यांनी कुणीच बघू नये. मात्र पुरेशी काळजी घेऊन ग्रहण पाहता येऊ शकतं. सुरक्षेचे उपाय न घेता ग्रहण पाहिल्यास डोळ्यांचे नुकसान होऊ शकते.
सूर्य ग्रहणा वेळेस गरोदर महिलांनी काय काळजी घ्यावी?
- ग्रहणाच्या काळात झोपू नये.
- चाकू, सुरी, पिन, कात्री अशा धारदार वस्तूंपासून दूर रहावं.
- शक्य असेल तर ग्रहणापूर्वी आणि नंतर डोक्यावरून आंघोळ करावी.
- नकारात्मक विचार दूर ठेवण्यासाठी ध्यान, स्मरण, मंत्रोच्चार करावा.
शक्यतो घरात रहावं
(नक्की वाचा: Safety Tips to Watch Surya Grahan: 21 जून रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण पाहताना कोणती काळजी घ्याल? जाणून घ्या काही खास टिप्स)
Father's Day Gift Ideas: फादर्स डे च्या निमित्ताने तुमच्या बाबांना द्या 'हे' खास गिफ्ट - Watch Video
दरम्यान पूर्वपार चालत आलेल्या रूढी परंपरांचा भाग म्हणून गरोदर महिलांना घरीच सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला जातो. मात्र काही अपरिहार्य कारण, मेडिकल इमरजंसी यामुळे घराबाहेर पडावं लागलं तर नक्कीच वैद्यकिय मदत घ्या. पुरेशी काळजी घ्या. खाण्या-पिण्याच्या, औषधाच्या वेळा सांभाळाव्यात.