Omicron वर Covishield लस किती प्रभावी? SII CEO Adar Poonawalla यांनी दिली 'ही' माहिती
Coronavirus Vaccine Covishield (Photo Credits: Adar Poonawalla's Twitter)

कोरोना वायरस मधील नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron) सध्या चर्चेचा विषय बनला आहे. जगात पहिल्यांदा साऊथ आफ्रिकेमध्ये आढळलेला हा व्हेरिएंट आता जगातील 12 देशांमध्ये पोहचला आहे. जागतिक आरोग्य संघटनेही (WHO) या व्हेरिएंट बद्दल चिंता व्यक्त केली आहे. ओमिक्रॉन झपाट्याने पसरू शकतो त्यामुळे त्याची दहशत अधिक आहे.भारतात अद्याप ओमिक्रॉनचे निदान झालेले नाही पण सरकार, प्रशासन हा धोका टाळण्यासाठी अलर्ट मोड वर येऊन काम करत आहे. मग या व्हेरिएंट वर कोविड 19 च्या लसी देखील निष्कामी ठरणार का? असा प्रश्न अनेकांच्या मनात आला आहे. सध्या सीरम इन्सिट्युटच्या अदार पूनावाला (Adar Poonawalla, CEO of Serum Institute of India) यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविशिल्ड (Covishield) या लसीचा ओमिक्रॉन वरील प्रभाव समोर येण्यासाठी अजून 2-3 आठवडे वाट पहावी लागणार आहे.

एनडीटीव्ही सोबत बोलताना, पूनावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्ताच ओमिक्रॉन भयंकर आहे की नाही हे सांगणं कठीण आहे. ओमिक्रनची दहशत पाहता बुस्टर डोसची शक्यता नाकारता येत नाही. सध्या तरी सरकारचं लक्ष्य हे प्रत्येक लाभार्थी नागरिकाला कोविड 19 लसीचे दोन्ही डोस वेळेत पूर्ण करणं हे असावं. Covishield, Covaxin जगाचं टेंशन वाढवणार्‍या Omicron व्हेरिअंट वर प्रभावी आहे का? जाणून घ्या ICMR Expert चं मत .

ओमिक्रॉन वर कोविड19 लसी, कोविशिल्ड किती प्रभावी आहेत? याचा अभ्यास सुरू आहे त्यामुळे सध्या धीर धरणं आपल्या हाती आहे. ऑक्सफर्ड च्या संशोधकांचा अभ्यास सुरू आहे. त्यांच्या निरिक्षणानुसार सध्याच्या लसीमध्ये बदल केले जाऊ शकतात आणि ही नवी लस बुस्टर डोस असू शकते. ही आगामी सहा महिन्यात समोर येऊ शकते. असे पूनावाला म्हणाले आहेत.

एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी नव्या व्हेरिएंट बद्दल भीती व्यक्त केली आहे. त्यामध्ये या व्हेरिएंट मध्ये अधिक म्युटेशन हे स्पाईक प्रोटीन मध्ये आहे. त्यामुळे मानवी शरीरात रोगप्रतिकारशक्तीला ते चकवा देऊ शकतात. म्हणूनच लसींचा त्यांच्यावरील प्रभाव यांचा अधिक कटाक्षाने अभ्यास करावा लागणार आहे.

रिपोर्ट्स नुसार, ऑमिक्रॉन मध्ये स्पाईक प्रोटीन मध्ये 30 पेक्षा अधिक म्युटेशन आहेत. यामुळे immune-escape mechanisms निर्माण होऊ शकते. सध्या उपलब्ध अनेक लसी स्पाईक प्रोटीन विरूद्ध अ‍ॅन्टिबॉडीज निर्माण करत आहेत. पण आता स्पाईक प्रोटीनमध्येच बदल झाल्यास अनेक लसी यामुळे कमी प्रभावी ठरू शकतात.

भारतामध्ये Indian SARS-CoV-2 Genomic Consortia कडून नव्या व्हेरिएंट चा जवळून अभ्यास केला जात आहे. देशात सध्या एकही ओमिक्रॉनचा रूग्ण नाही.