Covishield, Covaxin जगाचं टेंशन वाढवणार्‍या Omicron व्हेरिअंट वर प्रभावी आहे का? जाणून घ्या ICMR Expert चं मत
COVID-19 Vaccine (Photo Credits: IANS)

दीड दोन वर्षांनंतर कोरोना संकट थोडं आटोक्यात आल्याची चिन्हं असताना आता जगात पुन्हा ओमिक्रॉन(Omicron) या नव्या कोविड 19 व्हेरिएंट ने जगाचं टेंशन वाढवलं आहे. भारतामध्ये अद्याप हा व्हेरिएंट आढळला नसला तरीही सरकार अलर्ट मोड वर आलं आहे. देशात तज्ञांनी अद्याप वेट अ‍ॅन्ड वॉच ची भूमिका घेतली आहे. ICMR's Epidemiology and Communicable Diseases Division चे प्रमुख Dr S Panda यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'अशी शक्यता आहे की सध्याच्या कोविड 19 लसी ओमिक्रॉन विरूद्ध कमी प्रभावी ठरू शकतात. पण वेळचं या प्रश्नाचं अधिक चांगल्याप्रकारे उत्तर देऊ शकेल.'

साऊथ आफ्रिकेमध्ये आढळलेला हा नवा व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंट पेक्षा अधिक क्षमतेने संसर्ग पसरवू शकतो तसेच त्यामध्ये म्युटेशन अधिक असल्याचं सांगण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने B.1.1.529 हा Variant of Concern जाहीर केला होता. सध्या या व्हेरिएंट वर अधिक अभ्यास, निरिक्षण नोंदवण्याचं काम सुरू आहे. अद्याप यामुळे शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीला भेदून तो शरीरात जातोय का? याच ठाम उत्तर मिळू शकलेलं नाही. नक्की वाचा: Coronavirus: 'डेल्टा'पेक्षाही धोकादायक कोरोनाचा नवा स्ट्रेन Omicron; जगासमोर नवे आव्हान, घ्या जाणून .

ओमिक्रॉन व्हेरिएंट आणि लस

जगभरात कोविड 19 चा सामना करण्यासाठी विविध लशी उपलब्ध आहेत. काही विषाणूच्या स्पाइक प्रोटीनकडे डिरेक्टेट असतात जे रिसेप्टरशी संलग्न होतात. त्यामुळे तिथे बदल झाल्यास लस प्रभावी ठरू शकणार नाही. असे पांडा यांचं मत आहे. रिपोर्ट्स नुसार, दक्षिण आफ्रिकेमध्ये जिनोम सायंटिस्ट कडून नोंदवण्यात आलेल्या निरिक्षणामध्ये 50 पैकी 30 मध्ये स्पाईक प्रोटीन मध्ये म्युटेशन दिसून आले आहे. वायरस याच स्ट्रक्चरच्या माध्यमातून पेशींमध्ये प्रवेश करून हल्ला करतो.

mRNA vaccines या स्पाईक प्रोटीन्स आणि रेसिप्टर इंटरअ‍ॅक्शन कडे डिरेक्टेट आहेत. पांडा यांच्यामते या लसी थोड्या बदलाव्या लागू शकतात. पण सार्‍या लसी सारख्या नाही. कोविशिल्ड, कोवॅक्सिन सिस्टिम मध्ये असणार्‍या वेगवेगळ्या अ‍ॅन्टिजन मधून रोगप्रतिकारशक्ती बनवत आहेत.

कोविशिल्ड, कोवॅक्सिन ओमिक्रॉन वर प्रभावी आहे का?

भारतामध्ये आपत्कालीन मंजुरीमध्ये असलेल्या लसींमध्ये केवळ मॉर्डना ही mRNA vaccine आहे पण त्याचे डोस देशात उपलब्ध नाहीत. सध्या कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि स्पुटनिक वी लस दिली जात आहे. यामध्ये कोविशिल्ड ही आपल्या पेशींना महत्त्वाची माहिती देण्यासाठी वायरसच्या मॉडिफाईड व्हर्जन मध्ये बनवण्यात आली आहे. तर कोवॅक्सिन मध्ये कोरोना वायरस हा इनअ‍ॅक्टिव्ह स्वरूपात वापरण्यात आला आहे ज्यामुळे कोविड 19 ची लागण होणार नाही पण इम्यु सिस्टीमला माहिती दिली जाऊ शकते. स्फुटनिक वी देखील अडेनोवायरल बेस्ड वॅक्सिन आहे.

mRNA आणि adenoviral vector vaccines मध्ये स्पाईक प्रोटीन वापरण्यात आलेले नाही. लस दिलेल्यांमध्ये ते biosynthesis ची जेनेटिक इंफॉर्मेशन देतात. सध्या बदलणार्‍या वायरसच्या रूपाला रोखण्यासाठी लसींमध्ये बदलाची गरज बोलून दाखवण्यात आली आहे.

Pfizer/BioNTech, Moderna आणि Novavax यांनी आपण Omicron strain वर मात करू शकू असा दावा केला आहे.