Coronavirus | (Photo Credit: Archived, edited, representative images)

कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीत जगभरातील अनेक देशांनी घेतलेल्या लॉकडाऊनची कवाडे हळूहळू किलकिली होत आहेत. जग मुक्ततेच्या दिशेने पाऊल टाकताना पुन्हा एकदा लॉकडाऊन (Lockdown) लावण्याबाबतचे ढग घोंगावू लागले आहेत. कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरीएंटमुळे हा धोका निर्माण जाला आहे. बी.1.1.1.529 (Omicron Variant) असे या व्हेरीएंटचा प्रकार आहे. या स्ट्रेनला वैज्ञानिकांनी 'ओमिक्रॉन' (Omicron Variant) असे नाव दिले आहे. हा व्हेरिएंट कोरोनाच्या या आधीचा व्हेरिएंट 'डेल्टा' पेक्षाही धोकादायक असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हायरस लसीलाही दाद देत नाही. तसेच, त्याचा संक्रमणाचा वेगही जोरात आहे.

दक्षिण अफ्रीका देशात या व्हेरिएंटचे 100 पेक्षाही अधिक रुग्ण सापडल्याची प्राथमिक माहिती आहे. ज्या ठिकाणी हा स्ट्रेन सापडला आहे त्या ठिकाणी या स्ट्रेनचा प्रसार वेगाने होत असल्याचे पुढे येत आहे. या आठवड्यात पहिल्यांदा या व्हेरीएंटची ओळख दक्षिण अफ्रीकेत झाली. हा स्ट्रेन बोत्सवाना सह आजुबाजुच्या देशातही पसरला. धक्कादायक म्हणजे लसीकरण पूर्ण (सर्व डोस) झालेल्या नागरिकांनाही या स्ट्रेनने आपल्या विळख्यात घेतले आहे. बोत्सवाना येथील चार आणि दक्षिण अफ्रीकेतील 100 पेक्षाही अधिक नागरिकांमध्ये या नव्या व्हेरिएंटचा संसर्ग दिसून आला आहे. कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटचे नाव बी.1.1.529 असे ठेवण्यात आले आहे. यास 'बोत्सवाना व्हेरिएंट' असेही म्हटले जाते. (हेही वाचा, Omicron Variant: कोरोनाचा नवा स्ट्रेन 'ओमिक्रॉन'; जगभरात चिंता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बोलावली बैठक)

धोकादायक अशा बी.1.1.529 व्हेरिेएंटबाबत आपल्याला पाच गोष्टी माहिती करुन घ्यायला हव्यात. ज्यात युके, इस्त्राईल, इटली आणि सिंगापूरसह अनेक देशांना या व्हेरीएंटने धक्का दिला आहे.

दक्षिण अफ्रिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बी.1.1.529 (Omicron Variant) मध्ये वेगाने पसरण्याचे प्रमाण अधिक आहे. प्रामुख्याने तीसरी लाट ही डेल्टा व्हेरिएंटने आली होती. मात्र, चौथी लाट Omicron Variant मुळे येण्याची चिन्हे आहेत.

Omicron Variant आपल्या स्पाईक प्रोटीनमध्ये अधिक वेगाने वाढ करतो. ज्यामुळे मानवी शरीरातील विविध पेशींवर तो हल्ला करतो. Omicron Variant चे एकूण 50 म्यूटेशन आहेत. ज्यात एकट्या स्पाइक प्रोटीनवर 30 पेक्षा अधिक म्यूटेशन आहेत.

जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, नव्या व्हेरीएंटच्या प्रभावाला समजून घेण्यासाठी काही आठवडे लागू शकतात. वैज्ञानिकांचे म्हणने आहे की, आतापर्यंत हा सर्वात मोठा उत्परिवर्तित व्हेरिएंट आहे. ज्याचा अर्थ आहे की लसीकरण, जे चीनमधील वुहान येथून मूळ तणाव कमी करण्यासाठी राबविण्यात आले होते. डब्ल्यूएचओने Omicron Variant वर चर्चा रण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या आठवड्यात पहिल्यांदा दक्षिण अफ्रीकेत हा म्यूटेशन आढळून आला. हा स्ट्रेन बोत्सवाना सह आजूबाजूच्या देशांमध्येही पसरला. इस्त्राईलमध्ये मलावी येथून परतलेल्या एका व्यक्तीमध्ये हा व्हेरिएंट आढळून आला. हॉंगकाँगमध्ये दोन रुग्ण आढळून आले. या पार्श्वभूमीवर भारताने दक्षिण अफ्रिकेतून परतणाऱ्या नागरिकांची, प्रवाशांची कडक तपासणी करण्याचे अवाहन केले आहे.

व्हिरिएंटच्या उत्पत्तीबाबत अनेक अटकळ लावली जात आहे. लंडन येथील यूसीएस जेनेटिक्स इन्स्टीट्यूटचे निर्देशक फ्रेंकोईस बोलॅक्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवा स्ट्रेन एक जुन्या संक्रमितांना एचआयव्ही अथवा एड्सच्या रुग्णांमध्ये अधिक विकसित होण्याची चिन्हे आहेत.