Sand Boa Snake | (Images for symbolic purposes only । Photo Credits: pixabay)

Sand Boa Snake Life: सेक्स पॉवर (Sex power) आणि सँड बोआ प्रजातीचा साप यांचा अंत्यंत जवळचा संबंध असल्याचे सांगितले जाते. इतकेच नव्हे तर, लैंगिक शक्ती वृद्धीसोबतच कर्करोग आजारारव उपचारासाठी, महागडे परफ्युम आणि अंमली पदार्थ म्हणूनही या सापाचा आणि त्याच्यातील काही घटकांचा वापर केला जातो. सांगितले जाते की प्रामुख्याने इरेक्टाइल डिस्फंक्शन (Erectile dysfunction) म्हणजेच पुरुषाच्या लिंगाला उत्तेजना न येण्याच्या समस्येवरही गुणकारी म्हणून या सापला ओळखले जाते. याशिवाय सांधेदुकी इतर शारीरिक व्याधींवरही हा साप गुणकारी ठरतो म्हणे. मलेशिया देशात तर एक अंदश्रद्धा अशीही सांगितली जाते की, म्हणे लाल बोआ हा साप एखाद्या व्यक्तिचे नशीबही बदलो. या सापाच्या त्वचेचा वापर सौदर्यप्रसादने आणि पर्स हँडबॅग तसेच जॅकेट बनविण्यासाठीही केला जातो. तर अशा या नानाविध उपाय, उपचार आणि उपयोगासाठी प्रसिद्ध असलेला सँड बोआ साप (Sand Boa Snake) नेमका असतो कसा, खातो काय, कुठे मिळतो तसेच त्याचे जीवन कसे असते याबद्दल घ्या जाणून.

सँड बोआ हे नाव कसे पडले?

हा साप प्रामुख्याने वाळूमध्ये आणि वाळुखाली लपतो त्यामुळे याला सँड बोआ असे नाव पडल्याचे सांगितले जाते. अॅनाकोंडा सापाप्रमाणे सँड बोआ याचेही डोळे डोक्यावर असतात. वाळूमध्ये याचे लपून राहणेही मोठे रंजक आणि धोकादायक असते. कारण हा सापा वाळूखाली असा काही लपतो की, त्याचे अवघे शरीर वाळूखाली जाते तर केवळ डोकेच काय ते वर राहते. त्याच्या या लपण्याचा फायदा त्याला प्रामुख्याने शिकार करताना होतो. शिकार टप्प्यात येईपर्यंत तो अजिबात हालचाल करत नाही. पण, शिकार टप्प्यात येताच मात्र तो आपला डाव साधतो. काही लोक हा साप पळत असल्याचेही सांगतात. खास करुन हा साप उष्ण प्रदेशात अधिक वावरतो. (हेही वाचा,साप चावल्यावर या 7 प्रकारे मानवी शरीरात चढते विष, होतो मृत्यू; वाचा महत्त्वपूर्ण माहिती )

सँड बोआ प्रजनन काळ

सँड बोआ साप हा त्याच प्रजातीच्या मादी सापापासून जन्म घेतो. याचे वैशिष्ट्य असे की, हा साप जन्माला येतो तेव्हाच तो आठ ते 10 इंच इतक्या लांबीचा असतो. त्याचा प्रजनन काळ हा प्रामुख्याने पानगळ आणि थंड हवामान असा असतो. या सापाची पिल्ल वसंत ऋतू ते उष्ण ऋतूपर्यंत जन्माला येता. बेबी सँड बोआ छेटे किडे, कीटक आदींना आपले भक्ष्य बनवतो आणि गुजराण करतो.

सँड बोआ साप कोठे आढळतात?

सँड बोआ सापाच्या प्रजाती वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये पाहायला मिळतात. या सापाची एक प्रजात उत्तर अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर आढळते. प्रामुख्याने प्रशांत महासागर किनारपट्टी, तर दुसरी प्रजाती युरोपी, उत्तर अफ्रीका आणि अशिया खंडातील काही देशांमध्ये सापडतात. या सापाची एक प्रजाती प्रामुख्याने भारत आणि अफ्रिकेतही आढळते. (हेही वाचा, सेक्स पॉवर वाढविण्यासाठी सापाचा वापर? 3 कोटी रुपये किमतीच्या सँड बोआ प्रजातीच्या सापासह दिल्ली पोलिसांकडून एकास अटक)

सँड बोआ हा साप प्रामुख्याने इतर सापांप्रमाणेच मांसाहारी असतो. या सापांचा आहार राहण्याच्या ठिकाणानुसार वेगवेगळा असतो. इतर सापांप्रमाणे हे साप उंदीर, पाल, बेडूक, ससा आदी प्राण्यांना आपली शिकार बनवतात. हे साप वाळूखाली आपले शरीर लपवून ठेवतात. केवळ डोकेच वाळूबाहेर ठेऊन शिकार टप्प्यात येण्याची वाट पाहतात. शिकार टप्प्यात आली त्यावर झडप घालतात. महत्त्वाचे म्हणजे हे साप जोपर्यंत आपली शिकार बेशुद्ध होत नाही तोवर तिचे रक्त शोशत राहतात.