साप (Snake) हा तसा एक निरुपद्रवी पण तितकाच विषारी प्राणी. सर्पदंश (Snake Bite) झाल्याने म्हणजेच साप चावल्याने व्यक्तिचा मृत्यू झाल्याच्या बातम्या आपण अनेकदा ऐकतो. शक्यतो साप हा तसा मानवी परिसरात न राहणारा प्राणी. पण, कधी कधी त्याचे अस्तित्व मानवी परिसरातही दिसून येते. पण, तेही केवळ दगड, माती, विटा आणि अडगळीच्या ठिकाणी त्याचा निवास असतो म्हणून. वेद, पुराण आणि विविध धर्मशास्त्रं, पुस्तकं आदींमध्येही आपल्याला सापाचे विशेष महत्त्व पाहायला मिळते. पण, हाच साप एकाद्याच्या जीवावरही बेतू शकतो. महत्त्वाचे म्हणजे साप स्वत:हून कधीच कोणाला चावत नाही. जेव्हा सापला असे वाटते की विशिष्ट परिस्थितीत आपल्याला धोका आहे. तेव्हाच तो चावतो. एखाद्याचा जीव घेण्याईतपत विष निर्मिती होण्यासाठी सापाला जन्माला आल्यापासून साधारण 20 दिवस लागतात. सांगितले जाते की, सर्पदंश झाल्यानंतर व्यक्ती सात टप्प्यांनी मृत्यूपर्यंत पोहोचतो.
चार दात विषारी
सापाचा संपूर्ण जबडा विषारी नसतो तर, त्याच्या जबड्यात असलेले चार दात विषारी असतात. या दातांना हिदी भाषेत मकरी, कराली, कालरात्री आणि यमदूती म्हटले जाते. असे सांगतात की विष हे सापाच्या दातात नव्हे तर, त्याच्या डा्या डोळ्याजवळ असलेल्या एका ग्रंथीमध्ये असते. जेव्हा सापाला आपणास धोका आहे असे वाटते किंवा तो चिडलेला असतो तेव्हाच त्याच्या ग्रंथींमधील विष डोक्यांतून धमनीच्या मार्गातून दातांपर्यंत पोहोचते. (हेही वाचा, जाणून घ्या भारतात आढळणाऱ्या विषारी सापांच्या खास प्रजाती)
सर्पदंशानंतर मानवी शरीरात वेगाने धावते विष
पुरानात सांगीतले आहे की, साप चावल्यावर त्याचे विष मानवी शरीरात प्रवेश करते. हे विष जेव्हा मानवी शरीरात प्रेवश करते तेव्हा, त्याचा वेग दप्पटीने वाढतो. तसेच, हे विष जेव्हा रक्तात मिसळते तेव्हा त्याच्या वहनाचा वेग चौपटीने वाढतो. पित्तात हो विष आठपट, कफात 16 पटींनी वातात 30 तर, मज्जामध्ये हे विष 60 पटींनी धावते. इतक्या मोठ्या प्रमाणावर विष शरीरात धावले आणि त्या रुग्णाला जर वेळेत उपचार मिळाले नाहीत, तर तो रुग्ण वाचण्याची शक्यता कैक पटींनी कमी होते.
सर्पदंशानतर या सात प्रकारे होतो रुग्णाचा मृत्यू
सर्पदंश झालेल्या व्यक्तीच्या शरीरात विष जेव्हा चढू लागते त्याच्या 7 पायऱ्या आहेत. पहिल्यांदा विष अंगात चढत असताना त्या व्यक्तीच्या अंगावर रोमांच उभे राहतात. दुसरी पायरी म्हणजे त्या व्यक्तीच्या शरीरातून घाम येऊ लागतो. तिसऱ्या टप्प्यात त्याचे हातापायास कंप सुटतो. चौथ्या टप्प्यावर व्यक्तीची ऐकू येण्याची क्षमता कमी होत जाते. पाचव्या टप्प्यात विषबाधा झालेल्या व्यक्तीला उचकी लागायला सुरुवात होते. सहाव्या टप्प्यावर तो व्यक्ती मान टाकतो. तर, सातव्या टप्पा हा अंतिम असून, या टप्प्यावर त्या व्यक्तीचे प्राण जातात.
(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)