Nag Panchami 2019: नागपंचमी सणानिमित्त जाणून घ्या भारतात आढळणाऱ्या विषारी सापांच्या खास प्रजाती
Venomous Snakes in India | Image only representative purpose (Photo Credits: PixaBay)

Venomous Snakes in India: नागपंचमी हा महाराष्ट्रीय संस्कृतीचा वेगळेपण दाखवणारा खास पैलूच जणू. श्रावण महिण्यात येणारा हा सण राज्यभर मोठ्या उत्साहात साजरा होतो. विशेष म्हणजे नाग (सापाची एक प्रजात) या सणातील महत्त्वाचा घटक असतो. या दिवशी नाग (Nag) या सरपटणाऱ्या भूजलचर प्राण्याला देवासमान मानले जाते. गंमत अशी की, वर्षभर ज्या सापाला माणूस घाबरत असतो त्या सापाची देव म्हणून पूजा केली जाते. खरे तर हा मोठा विरोधाभास आहे. पण, असे केले जाते खरे. त्यात मजेशीर असे की, आपल्या समाजात असा एक सर्वसाधारण समज आहे की, साप म्हणजे तो विषारीच असतो. पण, भारतात आढळणारे सर्वच साप किंवा नाग विषारी नसतात. भारतात आढळणाऱ्या सापांच्या भारतात आढळणाऱ्या एकूण प्रजातींपैकी काहीच प्रजाती विषारी असतात. त्यापैकी कोबरा (Indian Cobra), क्रेट (Krait), रसेल वाइपर (Russell’s Viper) आणि सा-स्केल्ड वाइपर ( Saw Scaled Viper) या सापांची नावे घेता येऊ शकतील. नाग हा सापाचाच एक प्रकार आहे. नागपंचमी (Nag Panchami) निमित्त जाणून घेऊया भारतात आढणाऱ्या विषारी सापांच्या (Venomous Snakes in India) सहा प्रजाती.

भारतीय कोबरा, चश्माधारी (Indian Cobra, Spectacled)

नाग नावाने देशभरात ओळखला जाणारा इंडिनय कोबरा हा साप जगभरात विषारी म्हणून ओळखला जातो. Indian Cobra हे नागाचे अधिकृत नाव आहे. याला चष्माधारी (Spectacled) नाग असेही म्हटले जाते. जंगल, नदी प्रदेश, शेत, डोंगरी भाग किंवा गावांभोवतीच्या परिसरात या नागाचा अधिक निवास आढळतो. पाली, बेडूक, सरपटणारे छोटे प्राणी, कीटक असे या सापाचा आहार असतो. भारतात या सापाला 'पवित्र साप' म्हणून ओळखला जातो. पुरानात भगवान शंकर आणि शिवलिंगावर नागाचा निवास दाखवला जातो. नागपंचमी दिवशी या नागाची पूजा केली जाते.

भारतीय क्रेट, सामान्य क्रेट (Indian Krait, Common Krait)

सामान्य क्रेट हा सापही विषारी म्हणून ओळखला जातो. हा साप न्यूरोटॉक्सिक असल्याचे सांगतात. हा साप थेट मांसपेशींवर हल्ला करतो. हा साप माणसाला चावल्यास त्याच्य जीवावर बेतू शकते. प्राप्त माहितीनुसार या सापाच्या 12 प्रजाती आणि 5 उप-प्रजाती आढळतात. या सापाचा दंश झाल्यावर व्यक्तीचे वाचण्याचे प्रमाण फारच कमी असल्याचे सांगतात.

रसेल वाइपर, दाबोया (Russell’s Viper, Daboia)

रसेल वायपर नावाचा हा सापही विषारी सापांपैकीच एक आहे. रसेल वायपर हा भारतात आढळणारा दुसऱ्या क्रमांकाचा विषारी साप आहे. या सापाची लांबी साधारण 4 फूट इतकी असते. हा साप रंगाने भूरकट असतो. उंदीर, बेडूक, छोटे कीटक असे या सापाचे अन्न असते.

सॉ स्केल्ड वाइपर (Saw Scaled Viper)

मोठ्या डोळ्यांचा हा एक छोटा ते मध्यम आकाराचा साप आहे. याचे डोके मान आणि शरीराच्या मानाने अधीक मोठे असते. हा साप साधारण मऊ माती, तसेच उजाड जमीनीवर हा साप आढळतो. हा साप उंदीर, बेडूक आणि कीटकांचे सेवन करतो.

किंग कोबरा (King Cobra)

ग्रेट किंग कोबरा हा भारताती एस विषारी साप आहे. ज्याची सर्वसाधारण लांबी हा 13 ते 15 फूट इतकी असू शकते. पण, काही किंग कोब्रा हे तब्बल 18 फूट (5.5) इतक्या लांब आकाराचे असू शकतात. यासापाची गणणा जगातील सर्वात लांब सापांमध्ये केली जाते.

भारतीय पिट वाइपर (Indian Pit Viper)

भारतीय ग्रीन पीट वायपर हा साप झाडांवरचा साप म्हणून ओळखला जातो. हा साप एक विषारी साप म्हणून ओळखला जातो. हा साप प्रामुख्याने थंड प्रदेशा, हिवाळ्यात पाहायला मिळतो. हा साप बेडूक, उंदीर, कीडे खात असतो. याची लांबी साधारण 2.5 इतकी असू शकते.

भारत हा समुद्र, पर्वत, जंगल आणि नदी, डोंगर, दऱ्यांनी व्यापलेला एक विस्तिर्ण तितकाच संपन्न भुप्रदेश आहे. या भुप्रदेशावर वसली आहे ती प्राचीन हिंदू संकृती. या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे इथले सण-उत्सव, रुढी परंपरा आणि ते साजरे करण्याचे प्रकार. महाराष्ट्रातील मराठी संस्कृती हा सुद्धा या हिंदू संस्कृतीचाच अविभाज्य भाग. भारतातील हिंदू संस्कृतीत प्रादेशिकतेतून डोकावणारी विविधता हेसुद्धा एक वैशिष्ट्यच आहे. त्यामुळे नागपंचमी हा सण सुद्धा या वैशिष्ट्यांचाच एक भाग म्हणावा लागेल.