Wife Beating Husband | (Photo Credits: Archived, Edited, Symbolic Images)

कर्नाटक (Karnataka ) राज्यातील एका व्यक्तीने पंतप्रधान कार्यालयाकडे (Prime Minister Office) चक्क आपल्या पत्नीची तक्रार केली आहे. आपली बायको आपल्याला खूप मारहाण (Wife Beats Husband) करते. तिच्याकडून आपल्याला नियमीत मारहाण होत असते. आता ती सहन होत नाही. मला वाचवा. मला मदत आणि संरक्षण द्या, असे या तक्रारदार पतीचे म्हणने आहे. आपल्या पत्नीकडून आपल्या जीविताला धोका असल्याचा आरोपही या नवरेबुवाने केला आहे. (Husband Wife Relationship) पतीच्या या अजब तक्रारीमुळे पंतप्रधान कार्यालय अर्थातच पीएमओ (PMO) काय भूमिका घेते अथवा किंवा मदत घेते याबाबत उत्सुकता आहे.

तक्रारदार पती हा कर्नाटक राज्यातील बंगळुरु (Bengaluru) येथील राहणारा आहे. यदुनंदन आचार्य (Yadunandan Acharya) असे त्याचे नाव आहे. यदुनंदन आचार्य यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांच्या तक्रारी पीएमओकडे पाठवल्या आहेत. आचार्य यांनी ट्विटद्वारे आपली कैफीयत मांडत ते ट्विट बेंगळुरू शहराचे पोलिस आयुक्त प्रताप रेड्डी आणि केंद्रीय कायदा व न्याय मंत्री ( Union Minister for Law and Justice) किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांच्या हँडललाही टॅग केले आहे.

काय म्हटले आहे टविटमध्ये?

यदुनंदन आचार्य यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "मला कोणी मदत करेल का? किंवा जेव्हा हे घडले तेव्हा कोणी मला मदत केली? नाही. कारण मी पुरुष आहे! माझ्या पत्नीने माझ्यावर चाकूने हल्ला केला, हीच नारी शक्ती आहे का? यासाठी मी तिच्यावर घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल करू शकतो का? नाही! (हेही वाचा, Viral: दारुड्या बायकोची अर्ध्या रात्री नवऱ्याला बेदम मारहाण, नवऱ्याची थेट पोलिसात धाव)

ट्विट

आपली कैफीयत मांडताना यदुनंदन आचार्य यांनी 'पत्नीने वार केल्याने हातातून रक्तस्त्राव होत आहे' असेही म्हटले आहे. यदुनंदन आचार्य यांच्या ट्विटवर प्रतिसाद देताना बेंगळुरूचे पोलिस आयुक्त प्रताप रेड्डी यांनी त्यांना पोलिस स्टेशनला भेट देऊन कायदेशीर मदत घेण्याबाबत सूचवले. तसेच त्यांच्या तक्रारीचे निराकरण करण्याचे अश्वासनही दिले.

दरम्यान, यदुनंदन आचार्य यांना समाजाच्या विविध स्तरातून पाठिंबा मिळत आहे. अनेक पुरुषांना त्यांच्या पत्नीकडून छळले जाते. त्यांना मारहाण केली जाते. त्यांची मानहानी ही होते. परिणामी त्यांची सामाजिक कुचंबना होते. त्यामुळे पतींच्या समस्येकडेही लक्ष देणे आवश्यक असल्याचा मुद्दा समाजातील विविध स्तरातून अधोरेखीत केला जातो आहे.