एखाद्या स्त्रीला दारुडा नवरा असणं किंवा त्या नवऱ्याने रोज घरी येवून बायकोला मारहाण करणं ह्यात काही नाविन्य राहिलं नाही. आपल्या समाजातील अशा कित्येक स्त्रीया या प्रकारच्या त्याचारास बळी पडतात. पण जर हिच बाब उलट्या पध्दतीने घडली तर त्याचा तुम्ही काय म्हणणार? हो, असाच काहीसा अजब प्रकार उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) अलीगढ (Aligarh) मध्ये घडला आहे. एका विवाहीत दामपत्याचा (Married Couple) संसार सुरु होता. पण बायकोला वाईट सवय होती ती दारु प्यायची. नवरा कामावर गेला की ही बया रोज दारु प्यायची, भांग प्यायची आणि बघता बघता ती व्यसनाधीन (Addicted) झाली.
तिला तिच्या व्यसनाबाबत कुटुंबात कुणी काही बोल्ल्यास ती भांडण करायची. शिव्या घालायची, राडा करायची. गेल्या आठवड्यात नवरा कामावरुन थकून आला आणि नेहमी प्रमाणे झोपी गेला पण पत्नीने दारुच्या नशेत जोर जोरात शिवीगाळ करण्यास सुरु केली. नवऱ्यास झोपेतून उठवून त्याला मारहाण केली. एवढेचं नाही तर नवऱ्याच्या हातावर आणि छातीवर चावा घेत त्याला जखमी केले. (हे ही वाचा:-Viral Creative Wedding Invitation Card: फार्मासिस्टची गोळ्यांच्या पाकिटावरील मागील बाजूला क्रिएटीव्ह अंदाजात बनवत लग्नाचं आमंत्रण; सोशल मीडियात वायरल झाली लग्नपत्रिका)
घडलेल्या संबंधीत प्रकाराची माहिती 112 या पोलिस सहाय्यक क्रमांकावर मदत मागत पतीने घडलेल्या संबंधीत प्रकाराची माहिती दिली. तसेच या पतीने दारुड्या पत्नीवर कारवाईची मागणी केली आहे. कारण केवळ शिवीगाळ किंवा मारहाणचं नाही तर या दारुड्या पत्नीने कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.